अयोध्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा ‘ऐतिहासिक’ निर्णय

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ट्रस्ट स्थापन करून राम मंदिर उभारण्याचा आदेश दिला असून मुस्लिमांना अयोध्येत 5 एकर पर्यायी जागा देण्याचा आदेश दिला आहे. वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच असल्याचं सांगण्यात आलं आहे.

* ट्रस्ट स्थापन करून मंदिर उभारण्याचे आदेश
* वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच !
* मुस्लिमांना अयोध्येत 5 एकर पर्यायी जागा द्या : सर्वोच्च न्यायालय

राजकीय आणि सामाजिकदृष्टया अतिशय संवेदनशील विषयावरील निकालाचे वाचन सुप्रीम कोर्टात सकाळी साडेदहा वाजता सुरू झाले होते. सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्या अधिपत्याखाली 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे 40 दिवस सुनावणी झाल्यानंतर दि. 15 ऑक्टोबर रोजी कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निर्णय दिला आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like