अयोध्या प्रकरण : ‘पुनर्विचार’ याचिका दाखल न करण्याचा सुन्नी वक्फ बोर्डाचा निर्णय !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अयोध्येच्या प्रकरणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालीनंतर सुन्नी वक्फ बोर्डची बैठक झाली. या बैठकीत 7 मधील 6 सदस्यांनी रिव्यू पिटिशन (पूनर्विचार याचिका) दाखल न करण्याचे मत मांडले. तर एका सदस्याने या निर्णयाला विरोध केला. बहुमतात निर्णय घेण्यात आला की सुन्नी वक्फ बोर्ड सर्वोच्च न्यायालयात पूनर्विचार याचिका दाखल करणार नाही. परंतू मस्जिदीसाठी 5 एकर जमीन घ्याची की नाही यावर कोणतीही चर्चा या बैठकीत झाली नाही.

सुन्नी वक्फ बोर्डचे सदस्य अब्दुल रज्जाक यांनी सांगितले की बोर्डाकडून पूनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार नाही. बैठकीत फक्त अब्दुल रज्जाक असे एक आहेत ज्यांनी याचिका दाखल करण्याच्या बाजूने मत मांडले. परंतू बहुमताचा निर्णय 6-1 असा आहे. मस्जिदसाठी जमीन घ्याची की नाही यावर कोणतीही चर्चा झाली नाही. पुढील बैठकीत यावर चर्चा होईल. अब्दुल रज्जाक म्हणाले की जमिनी प्रकरणी निर्णय अजून झालेला नाही, जेव्हा सरकार ऑफर देईल तेव्हा यावर निर्णय घेण्यात येईल.

सुन्नी वक्फ बोर्डचे अध्यक्ष जफर फारुकी यांनी पहिल्यांदाच आपले मत मांडले आहे की सुन्नी वक्फ बोर्डने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करावा. परंतू ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्डने पूनर्विचार याचिका दाखल केल्यानंतर आता सुन्नी वक्फ बोर्डात देखील मतभेद निर्माण झाले आहेत. एका गटाचे म्हणणे आहे की पूनर्विचार याचिका दाखल करण्यात यावी तर दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे की हे प्रकरण पुढे नेऊ नये.

जफर फारुकी यांनी सांगितले की अब्दुल रज्जाक खान यांचे मत इतर सदस्य मान्य करत नाहीत. त्यांच्या मते सुन्नी वक्फ बोर्डाकडून पूनर्विचार याचिका दाखल करण्यात यावी कारण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात विरोधाभास आहे. शिवाय 5 एकर जमीन देखील घेण्यात येऊ नये कारण मस्जिदच्या स्वरुपात दुसरी मस्जिद बनवली जाऊ शकत नाही. मस्जिद कायमस्वरुपी असते.

Visit : Policenama.com