पुनर्विचार याचिका दाखल करणार नाही : सुन्नी वक्फ बोर्ड

वृत्तसंस्था : सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणाचा निकाल जाहीर केल्यानंतर सुन्नी वक्फ बोर्डानं कुठलीही पुनर्विचार याचिका दाखल करणार नाही असं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळं सुन्नी वक्फ बोर्डानं सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्विकारल्याचं दिसतं आहे.

सर्वोच्च न्यायालयानं आज निकाल दिला आहे. सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या घटनापीठानं आज ऐतिहासिक निर्णय दिला आहे. शिया वक्फ बोर्डाचा आणि निर्मोही आखाड्याचा दावा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला तर जागेचा मालकी हक्क रामललला न्यासाचा असल्याचा निर्णय दिला आहे. या प्रकरणाची सुनावणी 5 ऑगस्ट रोजी सुरू झाली होती. तब्बल 40 दिवस चालु असलेल्या सुनावणीनंतर दि. 17 ऑक्टोबरला निर्णय राखून ठेवण्यात आला होता. ट्रस्ट स्थापन करून राममंदिराची उभारणी करावी असं सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला सांगितलं. तर अयोध्येमध्येच 5 एकर जागा मुस्लिम पक्षाला देण्यात यावी असं देखील सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे.

Visit : Policenama.com 

You might also like