योगगुरु बाबा रामदेव यांचा मोठा दावा, म्हणाले – ‘आठवडाभरात ब्लॅक फंगसचे औषध देणार, काम अंतिम टप्प्यात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ॲलोपॅथी Allopathy ही मूर्ख अन् लंगडे विज्ञान आहे. सर्वप्रथम हायड्रोक्लोरोक्वीन फेल ठरले. त्यानंतर प्लाझा थेरपी अन् रेमडेसीवीर इंजेक्शनही फेल ठरल्याचे वादग्रस्त विधान करून अडचणीत आलेले योगगुरु बाबा रामदेव यांनी आता आपण लवकरच ब्लॅक फंगसवरील Black fungus औषध घेऊन येणार असल्याचा दावा केला आहे. कितीही वाद उद्भवले तरी मी 18 तास सेवाकार्य करत आहे. आठवडाभराच्या आत ब्लॅक फंगस, Black fungus येलो आणि व्हाइट फंगसवरील इलाज आयुर्वेदाच्या माध्यमातून देणार आहे. त्याचे काम झाले असून प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर आयएमए ना कुठली साइंटिफिक व्हॅलिडेशनची बॉडी आहे, ना त्यांच्याकडे कुठली लॅब आहे, ना त्यांच्याकडे कुणी वैज्ञानिक आहेत. आयएमए एक एनजीओ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Driving License : आता घरबसल्या बनवा तुमचं लर्निंग लायसन्स, जाणून घ्या

योग आणि आयुर्वेदाचा अनादर झाला आहे. आयएमए सातत्याने बल्ब, पेंट आणि साबनाचे प्रमाणीकरण करण्याचे काम करत आहे. तर कोरोनिलला अप्रमाणिक म्हणून आयुर्वेदाची खिल्ली उडवली जात आहे. यावरून वाद आहे, मी असे बोललो आहे, असे स्वामी रामदेव म्हणाले. दरम्यान कोरोना लसीकरण आणि ॲलोपॅथीसंदर्भात Allopathy बाबा रामदेव यांनी केलेल्या वक्तव्यावरून नाराज झालेल्या संघटनांनी त्यांच्या विरोधात कारवाई झाली नाही, तर विरोध आणखी तीव्र करण्याची घोषणा केली आहे. फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन इंडिया (फोर्डा)चे अध्यक्ष डॉक्टर मनीष म्हणाले, संस्थेशी संबंधित असलेले देशातील सर्व रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन आज 1 जून रोजी काळा दिवस पाळणार आहेत.

Gold-Silver Price Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात प्रचंड तेजी, Gold 50000 रूपयांच्या जवळ तर Silver 72 हजारांवर

Health in Your Hands : Corona सह गंभीर आजारांचा संकेत देतात तुमचे हात, असा घ्या शोध

Pune : पोलिसांच्या गुन्हे शाखेतील कर्मचारी आणि त्याच्या भावाकडून Covid केअर सेंटरमधील डॉक्टरला चौकीत घुसून मारहाण, प्रचंड खळबळ

Coronavirus Vaccination : कोविड-19 व्हॅक्सीनच्या साईड-इफेक्ट्सपासून आराम देऊ शकते का नारळपाणी?, जाणून घ्या

नारायण राणेंची मराठा समाजासाठी मागणी, म्हणाले – ‘3 हजार कोटींचे पॅकेज द्या’