Ayurveda For Good Sleep | रात्री झोप पूर्ण होत नाही का? मग ‘या’ 6 आयुर्वेदिक टिप्सची घ्या मदत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Ayurveda For Good Sleep | झोप आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तज्ञांच्या मते, प्रत्येकाने रात्री किमान 7 ते 8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे. असे बरेच लोक आहेत ज्यांना कुठेही आणि केव्हाही झोप येते, परंतु असेही बरेच लोक आहेत ज्यांना रात्री झोपण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात (Ayurveda For Good Sleep).

 

तुमचीही रात्र कुशी बदलण्यात जाते का? मग ही एक मोठी समस्या आहे आणि परंतु ही समस्या असणारे तुम्ही एकमेव व्यक्ती नाही. यावर अनेक प्रकारचे उपचार उपलब्ध असले तरी तुम्ही आयुर्वेद उपाय (Ayurveda Remedies) आवश्य करा. यासाठी काही सोप्या टिप्स जाणून घेवूयात (Ayurveda For Good Sleep)…

 

चांगली झोप येण्यासाठी घरगुती आयुर्वेदिक उपाय (Ayurvedic Home Remedies For Good Sleep)

1. जीवनशैलीत करा बदल (Lifestyle Changes) :
जीवनशैली (Lifestyle) सुधारणे खूप महत्वाचे आहे. चांगल्या झोपेसाठी वेळेवर झोपायला जाणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही वेळेवर झोपण्याचा प्रयत्न केला नाही तर निद्रानाशाची समस्या वाढू शकते.

 

2. कोमट दूध प्या (Drink Warm Milk) :
दुधामध्ये ट्रिप्टोफॅन असते, जे झोप वाढवण्यास मदत करते. रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध प्यायल्याने चांगली झोप येण्यास मदत होते. झोपण्यापूर्वी एक कप कोमट दुधात अर्धा चमचा दालचिनी पावडर (Cinnamon powder) टाकून प्या.

 

3. तेल मालिश उपयोगी (Oil Massage) :
डोके व पायांना भृंगराज तेलाने मसाज केल्याने झोप चांगली लागते. या तेलाने मसाज केल्याने मज्जासंस्थेला आराम मिळतो.

4. केशर (Saffron) :
जर तुम्हाला झोपेचा उपचार करायचा असेल तर केशर देखील यामध्ये मदत करू शकते. एक कप कोमट दुधात दोन चिमूट केशर मिसळून प्या. केशरमध्ये इम्युनिटीला फायदा देणारे घटक असतात.

 

5. जिरे (Cumin) :
आयुर्वेदात औषधी गुणधर्माने समृद्ध असलेले जिरे झोपेसाठी फायदेशीर मानले जाते. यात मेलाटोनिन असते, जे निद्रानाश आणि झोपेच्या इतर विकारांना दूर करते. मेलाटोनिन हा होर्मोन आहे जो झोपेसाठी मदत करतो. झोपण्यापूर्वी जिर्‍याचा चहा चांगली झोप देण्यास मदत करतो. दुधात एक चमचा जिरे पावडर (Cumin Powder) टाकून प्यायल्याने रात्री चांगली झोप लागते.

 

6. जायफळ (Nutmeg) :
गरम दूध झोपेसाठी फायदेशीर आहेच, पण यात जायफळ पावडर मिसळून प्यायल्यास झोप न येण्याच्या समस्येवर मात करता येते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Ayurveda For Good Sleep | Isn’t sleep complete at night? Then here are 6 Ayurvedic tips to help

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Phone Tapping Case | पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या तोंडी आदेशाने केले गेले फोन टॅपिंग

 

Mohit Kamboj | ‘श्री उद्धव ठाकरे जी और श्री शरद पवार साहब मैं आप दोनो से…’; महापालिकेच्या नोटीसनंतर मोहित कंबोज आक्रमक

 

Sanjay Raut | संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले – “यांची हाडं राजकीय स्मशानात रचली गेली आहेत, त्यांना कायमचं…”