‘या’ आयुवेर्दिक उपायांमुळे तणाव होईल दूर

पोलिसनामा ऑनलाइन टीम – मानसिक तणाव शरीरासाठी चांगल नाही. कारण तणावामुळे शरीराचे खूप नुकसान होते. यामुळे शरीरात पित्त, कफ आणि वाताचे संतुलन बिघडते. शिवाय अ‍ॅलर्जी, दमा, रक्तातील लाल पेशींमध्ये वाढ, उच्चदाब यासारख्या समस्या उद्भवतात. मात्र, काही आयुर्वेदिक औषधींच्या सेवनाने तणावापासून मुक्ती मिळवता येऊ शकते.

ब्राह्मी ही वनस्पती तणाव निर्माण करणाऱ्या लाल पेशी कमी करण्याचे काम करते. ही तणावाच्या प्रभावावर प्रतिक्रियात्मक कारवाई करण्यासाठी ओळखली जाते. ब्राह्मी मेंदूला शांत ठेवण्यासोबतच एकाग्रता वाढवण्यात मदत करते. तर भृंगराज मेंदूला निरंतर ऊर्जा देण्याचे काम करतो. यामुळे मेंदूतील रक्तप्रवाह सुरळीत राहतो. भृंगराज मेंदूला शांत ठेवून पूर्ण शरीराला आराम पोहोचवतो. जटामासी अँटी स्ट्रेस हर्ब म्हणून प्रसिद्ध आहे. तणाव दूर करण्यासाठी जटामासीच्या मुळांचा उपयोग केला जातो. यामुळे मेंदूला नवी चालना मिळण्यास मदत होते. अश्वगंधा हे अ‍ॅमिनो अ‍ॅसिड्स आणि व्हिटॅमिन्सचे चांगले मिश्रण आहे. याच्या सेवनाने मेंदूमध्ये नवी ऊर्जा निर्माण होते आणि शरीर बळकट होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/