Ayurveda Tips And Exercise To Improve Eyesight | डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी आयुर्वेदाने सांगितल्या ‘या’ 5 सोप्या पद्धती

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Ayurveda Tips And Exercise To Improve Eyesight | आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि बहुतांश वेळ स्क्रीनवरच (Screen) जातो. मुलं बराच वेळ ऑनलाइन राहतात, आहार सुद्धा असा असतो की त्यांना लहान वयातच चष्मा लागतो. याशिवाय पावसाळ्यातही डोळ्यांना संसर्ग होण्याचा धोका असतो. डोळे (Eyes) अतिशय संवेदनशील असतात, त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे. तरी सुद्धा बहुतेक लोक त्यांच्यासाठी कोणतेही विशेष प्रयत्न करत नाहीत. आयुर्वेदात अशा अनेक पद्धती सांगितल्या गेल्या आहेत, ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी वाढते तसेच इन्फेक्शनपासून बचाव होतो. येथे काही टिप्स जाणून घ्या. (Ayurveda Tips And Exercise To Improve Eyesight)

 

आयुर्वेद टिप्स फॉलो करा (Ayurveda Tips)
जुन्या काळी फक्त वृद्ध लोकच चष्मा घालताना दिसत होते. आजकाल लहान मुलांची दृष्टी क्षीण होऊ लागली आहे. आयुर्वेद डॉक्टर दिक्षा भावसार यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर काही टिप्स शेअर केल्या आहेत ज्या तुमचे डोळे निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

 

1. ऑर्गेनिक गुलाब जल (Organic Rose Water)
ऑरगॅनिक गुलाबपाणी डोळ्यात टाका, डोळ्यांचा थकवा दूर होईल आणि जळजळ किंवा इतर कोणतीही समस्या असेल तर आरामही मिळेल. (Ayurveda Tips And Exercise To Improve Eyesight)

2. गायीचे तूप (Ghee)
गाईचे तूप आरोग्यासाठी खूप चांगले आहे. ते खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्यही चांगले राहते. ते डोळ्यांना किंवा नाकपुडीत लावल्याने डोळ्यांना फायदा होतो.

 

3. त्रिफळा (Triphala)
त्रिफळा हे तीन प्रकारच्या औषधी वनस्पतींचे मिश्रण आहे. हे बाजारात उपलब्ध आहे किंवा तुम्ही घरीही बनवू शकता. हे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. याशिवाय ते पोट, त्वचा आणि केसांसाठीही चांगले आहे.

 

4. फेरफटका मारणे
रिफ्लेक्सोलॉजीच्या शास्त्रानुसार, जेव्हा आपण चालतो तेव्हा पायाच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या बोटावर जास्त दाब असतो. या दोघांना सर्वात जास्त नर्व्ह एंडिंग असतात. जेव्हा आपण चालतो, विशेषत: अनवाणी, तेव्हा दृष्टी अधिक चांगली होते.

 

5. डोळ्यांचे व्यायाम (Eye Exercises)
जर तुम्ही कॉम्प्युटरवर काम करत असाल तर दर अर्ध्या तासाने डोळे मिचकावण्याची सवय लावा. डोळे बंद करून मधे ब्रेक घ्या. दररोज 10 मिनिटे डोळे बाजूला, वर-खाली, घड्याळाच्या दिशेने आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने हलवून व्यायाम (Exercise) करा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Ayurveda Tips And Exercise To Improve Eyesight | ayurveda tips and exercise to improve eyesight

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Cholesterol | ‘या’ हिरव्या भाजीपासून तयार करा स्पेशल Herbal Tea, हाय कोलेस्ट्रॉलपासून होईल सुटका

Ginger-Sore Throat and Pain | घशात खवखव आणि वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी रामबाण आले, ‘या’ 3 प्रकारे करू शकता वापर

Turmeric Side Effects | कोणत्या लोकांनी करावे हळदीचे कम सेवन, जाणून घ्या एका दिवसात किती प्रमाण योग्य