Ayurvedic Drinks | उन्हाळ्यातील रामबाण उपाय – आयुर्वेदिक ड्रिंक ! गॅस, थकवा, तोंडात फोड आणि डायरियामध्ये तात्काळ आराम देतील ‘हे’ हेल्दी ड्रिंक, जाणून घ्या कृती

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Ayurvedic Drinks | देशभरात उन्हाळ्याचे तापमान (Temperature In Summer Season) वाढत असल्याने शरीराला थंडावा देण्यासाठी लोक विविध उपाय करत आहेत. कोणी शरीर आणि पोट थंड ठेवण्यासाठी लस्सीचा वापर करत असेल तर कोणी सरबत (Lemonade), तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही ड्रिंकबद्दल (Cold Drinks) सांगणार आहोत ज्यांना आयुर्वेदिक ड्रिंक (Ayurvedic Drinks) म्हणतात.

 

उन्हाळ्यात तिच-तिच ड्रिंक पिण्याचा तुम्हाला कंटाळा येत असेल तर हे आयुर्वेदिक पेय तुमच्यासाठी आहे. कोणती आयुर्वेदिक पेये या कडक उन्हात चव आणि आरोग्यदायी लाभ देतात ते जाणून घेवूयात (Ayurvedic Drinks)…

 

हेल्दी आणि टेस्टी आयुर्वेदिक ड्रिंक (Ayurvedic Drinks Benefits)
अशी अनेक ड्रिंक आहेत जी लोक उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी लोक घेतात, परंतु काही अशी पेये आहेत जी तुम्हाला टेस्टसोबतच एनर्जी देखील देतात. अशाच काही ड्रिंकबद्दल जाणून घेऊया.

 

1. आयुर्वेदिक ड्रिंक – गुलकंद शॉट्स (Gulkand Shots)
उन्हाळ्यात जर तुम्हाला त्याच प्रकारचे ड्रिंक पिऊन कंटाळा येत असेल तर तुम्ही गुलकंद शॉट्स वापरून पहा.
त्याची चव खूप चांगली आहे आणि शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.
उन्हाळ्यात याचा वापर केल्याने तुमचे पोट आणि मन दोन्ही शांत राहते.

 

याच्या नियमित वापराने तुमचे वजनही कमी होऊ शकते आणि शरीराच्या इतर अनेक समस्या जसे डोळे कमजोर होणे,
पोटात गॅस होणे, थकवा येणे, तोंडात व्रण येणे अशा अनेक समस्या दूर होऊ शकतात.

गुलकंद शॉट्स कसे तयार करावे (How To Make Gulkand Shots)
गुलकंद शॉट्स तयार करणे खूप सोपे आहे. हे करण्यासाठी, प्रथम तुम्ही एक ग्लास दूध घ्या आणि त्यात एक चमचा गुलकंद मिसळा.
नंतर, हे मिश्रण चांगले मिसळा आणि ग्लासमध्ये सर्व्ह करा. जर तुम्हाला त्याची चव घ्यायची असेल तर तुम्ही त्यात थोडा बर्फही टाकू शकता.

 

2. पुदीना सरबत (Mint Juice)
उष्णतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुदिना हा रामबाण उपाय मानला जातो. त्याचप्रमाणे पुदिन्याचे सरबत देखील शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.
यामुळे तुमचे शरीर तसेच पोट थंड राहते. पुदिन्याचे सरबत थकवा, बद्धकोष्ठता आणि जुलाब यांसारख्या समस्यांपासून देखील आराम देते.
म्हणून ते वापरण्याची शिफारस केली जाते.

 

कसे तयार करावे (How To Make)
प्रथम काही पुदिन्याची पाने घ्या. ग्लासमध्ये दोन-तीन पाने टाका आणि त्यात थोडेसे खडे मीठ टाकून चांगले मिसळा.
जर तुम्हाला अधिक चव हवी असेल तर तुम्ही त्यात लिंबू देखील घालू शकता.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Ayurvedic Drinks | ayurvedic drink is the panacea of summer gives instant relief in gas fatigue mouth ulcers

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Actress Prema Kiran Passed Away | ‘धुमधुडाका’, ‘दे दणादण’ सह अनेक मराठी चित्रपट गाजविलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचे 61 व्या वर्षी निधन !

 

LPG Cylinder Price 1 May 2022 | एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 100 रुपयांपेक्षा जास्त वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

 

Kishori Pednekar on Raj Thackeray | ‘…म्हणून राज ठाकरे हिंदुत्वाचं कार्ड चालवत आहेत’; किशोरी पेडणेकरांचं राज ठाकरेंवर टीकास्त्र