Ayurvedic Herbs To Control Diabetes | शुगर करायची असेल कंट्रोल तर ‘या’ गोष्टींचे करा सेवन

नवी दिल्ली : Ayurvedic Herbs To Control Diabetes | सध्या डायबिटीज हा एक मोठा आजार बनला आहे. या आजाराने ग्रस्त लोकांना जीवनशैली बदलावी लागते, याशिवाय आहारातही मोठे बदल करावे लागतात. यामुळे डायबिटीज रुग्ण चिंतेत असतात. शुगर लेव्हल कंट्रोल करणारे काही घरगुती उपाय यासाठी जाणून घेवूया

 

धणे (Coriander Seeds)

डायबिटीज असल्यास तुम्ही धणे सेवन करू शकता. ते स्वादुपिंडाच्या (Pancreas) पेशींना जास्त इन्सुलिन (Insulin) तयार करण्यास मदत करतात. याशिवाय धण्यांच्या सेवनाने शरीरातील रक्तातील शुगर काढून टाकण्यास मदत होते.

 

मेथीदाणे (Fenugreek Seeds)

शुगर कंट्रोल करण्यासाठी मेथीदाणे सेवन करू शकता. यात नैसर्गिक अमीनो अ‍ॅसिड (Amino Acid) फॉर-हायड्रॉक्सी आयसोलॅट (4-Hydroxy Isolate) असते, जे शरीराच्या पॅनक्रियाज आयलेट पेशींमध्ये ग्लुकोजद्वारे उत्तेजित इन्सुलिनचे प्रमाण वाढवते.

 

दालचिनी (Cinnamon)

शुगर कंट्रोल करण्यासाठी दालचिनी वापरू शकता. दालचिनी शरीरातील इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी (Insulin Sensitivity) वाढवते आणि शुगर लेव्हल कंट्रोल ठेवण्यास मदत करते.

 

कधी होते ही समस्या

तज्ञ सांगतात की जेव्हा शरीरात इंसुलिन योग्य प्रकारे तयार होत नाही, तेव्हा शुगरची समस्या उद्भवते. त्यामुळे या आजारात ज्या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते अशा पदार्थांचे सेवन करण्यास मनाई आहे.

 

Web Title : Ayurvedic Herbs To Control Diabetes | diabetes-ayurvedic-herbs-to-control-your-sugar-level

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा