वारंवार चेहरा धुवूनही त्वचा तेलकटच राहते ? ‘हे’ उपाय एकदा कराच !

पोलीसनामा ऑनलाइन टीम –प्रत्येकाला त्वचेची काही ना काही समस्या असतेच. कोणाची त्वचा तेलकट असते तर कोणाची कोरडी. तेलकट त्वचेच्या (Oily skin)  समस्येमुळं अनेकजण त्रस्त असतात. अनेक उपाय करूनही त्यांना फायदा मिळत नाही. परंतु नैसर्गिक उपाय केले तर यावर फायदा मिळू शकतो. इतकंच नाही तर चेहऱ्यावरील ग्लो देखील वाढेल. आज आपण यासाठी काही सोपे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. खास बात अशी की यांचे कोणतेही दुष्परिणाम देखील होत नाहीत.

1) कोरफड – कोरफड मध्ये अँटी इम्फ्लेमेट्री गुण असतात. यामुळं त्वचेचं इंफेक्शन दूर होतं. जर याचं जेल किंवा कोरफडीचा गर चेहऱ्याला रोज लावला तर तेलकटपणा दूर होतो. त्वचेतील पाण्याचं प्रमाण कायम राखण्यासाठी कोरफड आणि हळद हे जास्त रामबाण उपाय ठरतात. यासाठी 1 चमचा हळद, कोरफडीचा गर आणि काकडीचा रस हे सर्व पदार्थ एकत्र करून ही पेस्ट 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावी आणि त्यानंतर कोमट पाण्यानं चेहार धुवून टाकावा.

2) चंदन आणि हळद – चंदन आणि हळद यांच्या वापरानं तेलकट त्वचा नाहीशी होते. चंदन आणि हळद यांची पेस्ट लावली तर चेहऱ्याची चकाकी वाढते. यासाठी समप्रमाणात चंदन आणि हळद घ्या. यात लिंबाचा रस किंवा पाणी टाकून पेस्ट तयार करा. ही पेस्ट 10 मिनिटांपर्यंत चेहऱ्यावर लावून ठेवा. 10 मिनिटांनी चेहरा पाण्यानं स्वच्छ करून घ्या.

3) मुलतानी माती – चेहरा उजळण्यासाठी याचा खूप फायदा होतो. याचा लेप चेहऱ्याचा कोरडेपणा दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. तेलकट चेहऱ्यावर याचा वापर केल्यास चेहरा तजेलदार होतो. मुलतानी मातीत पाणी टाकून चांगलं मिश्रण करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. तुमचा चेहरा अधिक तजेलदार दिसेल. तेलकटपणाही यामुळं दूर होतो.

3) दूध – तुमची त्वचा जर तेलकट असेल तर दुधाचा लेप चेहऱ्यावर लावा. लिंबू आणि दूध व्यवस्थित एकत्र करा. हे मिश्रण कॉटनच्या कपड्यानं चेहऱ्यावर लावा. दिवसातून दोन वेळा हा प्रयोग करा. यामुळं तेलकटपणा दूर होऊन त्वचा तजेलदार आणि सॉफ्ट होईल.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.