‘आयुष्मान भारत’च्या लाभार्थींनी पार केला 1 कोटीचा आकडा, PM मोदींनी केलं अभिनंदन

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – आयुष्मान भारतने एक करोड लाभार्थींचा आकडा पार केला आहे. अभियानाच्या यशावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर, नर्सेस, हेल्थकेअर स्टाफचे कौतूक केले आहे. ते म्हणाले, 2 वर्षांपेक्षा कमी काळात आयुष्मान भारतने खुप मोठे यश मिळवले आहे. या अभियानाचा अनेकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले की, मी आपले डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी आणि आयुष्मान भारतशी संबंधीत सर्व लोकांचे कौतूक करतो. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा जगातील सर्वात मोठा आरोग्य कार्यक्रम बनला आहे. या उपक्रमाने अनेक भारतीय, विशेषता गरीब आणि दलितांचा विश्वास संपादन केला आहे.

पीएम मोदी पुढे म्हणतात, प्रत्येक भारतीयाला गर्व होईल की, आयुष्मान भारतच्या लाभार्थ्यांची संख्या 1 करोडच्या पुढे गेली आहे. दोन वर्षांपेक्षा कमी काळात या उपक्रमाचा लोकांवर सकारात्मक परिणाम झाला आहे. मी सर्व लाभार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा देतो. मी त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो.

काय आहे आयुष्यमान भारत योजना ?

आयुष्मान भारत योजनेला केंद्र सरकारने 21 मार्च 2018 ला मंजूरी दिली होती. याची सुरूवात 30 एप्रिल 2018 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगढच्या बीजापुरमध्ये केली होती. या योजनेंतर्गत येणार्‍या कुटुंबांना पाच लाखांपर्यंत कॅशलेस आरोग्य विमा उपलब्ध केला जातो.

आयुष्मान भारतद्वारे कोरोना उपचार

आयुष्मान भारत योजनेंतर्गत कोरोना उपचाराची सुविधा देण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने एप्रिलमध्ये म्हटले होते की, आता 50 करोडपेक्षा जास्त नागरिक राष्ट्रीय आरोग्य वीमा योजना म्हणजेच आयुष्मान भारत अंतर्गत येतात. खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोना व्हायरस संसर्गाची मोफत तपासणी आणि पॅनलच्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करता येतात.