Free मध्ये मिळेल आयुष्यमान भारत कार्ड ! 5 लाख रुपयांपर्यंत घेऊ शकता फायदा, जाणून घ्या काय करावं लागेल?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आयुष्यमान भारतला प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेद्वारे लाभ दिला जाईल. आता कुणीही व्यक्ती आयुष्मान भारत कार्ड एकदम मोफत प्राप्त करू शकतो. यापूर्वी यासाठी 30 रुपये घेतले जात होते. आयुष्मान योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला उपचारासाठी वर्षात 5 लाख रुपये दिले जातात.

जाणून घ्या काय आहे योजना?

या योजनेंतर्गत घरी जाऊन डिटेल घेतल्या जातील आणि नंतर कार्ड उपलब्ध केले जाईल. हे कार्ड पीव्हीसी प्रकारचे मिळेल. विशेष म्हणजे यासाठी तुमच्याकडून पैसे घेतले जाणार नाहीत. या अभियानाचा हेतू आहे की, आयुष्यमान भारत स्कीम अंतर्गत येणार्‍या लोकांचे पक्के कार्ड बनवले जावे ज्यामुळे आजारात त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचार मिळू शकतो. उपचारासाठी त्यांना विम्याचे पैसे मिळू शकतात. आयुष्यमान योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला उपचारासाठी वर्षाला 5 लाख रुपये दिले जातात.

आता कसे तयार होते कार्ड

आतापर्यंत आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना ई कार्ड बनवावे लागत होते, ज्यासाठी त्यांना कॉमन सर्व्हिस सेंटरवर जावे लागत होते. तिथे प्रति लाभार्थी 30 रुपये आकारले जात होते. ते सुद्धा एका कागदावर डिटेल लिहून देत असत, परंतु आता घरीच फ्रीमध्ये कार्ड मिळेल. देशभरात आयुष्यमान भारत योजने अंतर्गत 10 कोटी कुटुंब, ज्यांची सदस्य संख्या 54 कोटी आहे. अजूनपर्यंत सुमारे सवा कोटी कार्डच बनवता आले आहेत म्हणजे एक मोठा गॅप आहे जो सरकारला भरायचा आहे.

30 एप्रिलपर्यंत नि:शुल्क गोल्डन कार्ड

प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना अंतर्गत आरोग्य विभागाकडून सुरू असलेल्या नि:शुल्क गोल्डन कार्ड बनवण्याचे विशेष अभियान 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आले आहे. गोल्डन कार्ड धारकांना पाच लाख रुपयांपर्यंत मेडिकल सुविधा घेण्याची तरतूद आहे.