चक्क ‘त्या’ आमदारानं चोरली आयुष्यमानची हेल्थ कार्ड, ‘उलट-सुलट’ चर्चेला उधाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या योजनेचे श्रेय लाटण्याच्या हव्यासापायी आमदार नागरिकांनाच त्या योजनांपासून वंचित ठेवत असल्याचे समोर आले आहे. सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराने आयुष्यमान भारत या आरोग्य योजनेची सुमारे 15 हजार कार्ड हडपसर क्षेत्रीय कार्यालयातून चोरून नेले आहेत. त्यामुळे अनेक नागरिक सुविधेपासून वंचित राहिले आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन तुपे पाटील यांनी आज पत्रकार परिषेदेत केला आहे. याप्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही तुपे यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये सर्वसामान्य व गरीब जनतेला माफक दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आयुष्यमान भारत ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. पुणे शहरात महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय पातळीवर ही योजना राबविण्यात येत आहे. यासाठी गरीब नागरिकांकडून अर्जही भरून घेण्यात आले असून त्याचे हेल्थ कार्ड तयार करण्यात आले आहेत. तयार झालेले हेल्थ कार्ड घेऊन जावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. यासाठी नागरिकांकडून फी देखील आकारण्यात आली आहे.

दरम्यान, हडपसर क्षेत्रीय कार्यालयात गेलेल्या नागरिकांना कार्ड घ्यायला गेल्यावर धक्काच बसला. कारण त्यांच्या नावाचे कार्ड आमदारांनी नेले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत माहिती देताना चेतन तुपे म्हणाले, की हडपसर क्षेत्रीय कार्यालयात जवळपास 15 ते 17 हजार नागरिकांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत. या नागरिकांची कार्डही तयार करण्यात आली आहेत. नागरिकांनी हे कार्ड घेऊन संबंधित निवडलेल्या रुग्णालयात नोंदणी केल्यानंतर त्यांना उपचार सुविधा मिळणार आहे. मात्र आता आमदारांनीच कार्ड नेल्याने नागरिकांची पंचाईत झाली आहे.

मागील आठ महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. अधिकारीही ही कार्ड चोरीला गेल्याचे सांगत आहेत. नेमक्या कोणत्या आमदारांनी ही कार्ड नेली आहेत, हे मात्र ते सांगत नाहीत. शहरातील इतर क्षेत्रीय कार्यालयात ही असाच प्रकार झाल्याचा संशय आहे. हेल्थ कार्ड चोरणाऱ्या आमदाराची चौकशी करावी. एक प्रकारे पंतप्रधानांचा अवमान करणाऱ्या आमदाराकडील कार्ड जप्त करून संबंधित नांगरिकाना देण्यात यावी. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चेतन तुपे यांनी पोलिसांकडे केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like