PMJAY : आयुष्मान भारत योजनेसाठी ‘या’ पध्दतीनं करा नोंदणी, 1 कोटी लोकांना मिळालाय ‘लाभ’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सप्टेंबर २०१८ मध्ये आयुषमान भारत आरोग्य विमा योजना सुरू झाल्यानंतर देशभरातील एक कोटीहून अधिक लोकांनी या योजनेंतर्गत मोफत उपचार केले आहेत. या योजनेंतर्गत येणाऱ्या लोकांनी देशभरातील विविध रुग्णालयात सुमारे १३,४१२ कोटी रुपयांचे मोफत उपचार घेतले आहेत. लोकांनी या योजनेंतर्गत सर्वात जास्त हाडे, हृदय रोग, हृदय व वक्ष रोग, नससंबंधी रोग, किरणोत्सर्ग प्रेरित कर्करोग आणि मूत्र आजारांवर उपचार केले आहेत. PMJAY २०२० अंतर्गत जन सेवा केंद्रात आयुषमान मित्र यांच्यामार्फत गोल्डन कार्ड बनवले जात आहेत, या गोल्डन कार्डच्या माध्यमातून कोणत्याही सरकारी रुग्णालयात व खासगी आरोग्य केंद्रात ५ लाखांपर्यंत मोफत उपचार करू शकतात. या योजनेंतर्गत औषधांचा खर्च, वैद्यकीय खर्च सरकारकडून केला जातो आणि १३५० आजारांवर उपचार केले जातात.

PMJAY साठी ऑनलाईन नोंदणी कशी करावी?
सर्वप्रथम पंतप्रधान आयुषमान भारत योजनेचे अधिकृत संकेतस्थळ @pmjay.gov.in वर जा.
यानंतर ‘AM I Eligible’ हा पर्याय संकेतस्थळाच्या होम पेजवर दिसेल, या पर्यायावर क्लिक करा. पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो उघडेल. त्यानंतर पात्र विभागा अंतर्गत लॉगिन करण्यासाठी आपल्या मोबाईल नंबरला ओटीपीसह सत्यापित करा. लॉगिन नंतर पंतप्रधान आयुषमान भारत योजनेत आपल्या कुटुंबाची पात्रता तपासा. त्यानंतर दोन पर्याय दिसतील, पहिल्या पर्यायामध्ये आपले राज्य निवडा. यानंतर दुसर्‍या पर्यायात तीन कॅटेगरी येतील, आपल्या रेशन कार्ड आणि मोबाइल नंबरमधून दिलेल्या श्रेणीपैकी एक निवडू शकता. यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

ही कागदपत्रे आवश्यक
आधार कार्ड, रेशनकार्ड, मोबाईल नंबर, पत्त्याचा पुरावा

ऑफलाईन अर्ज कसा करावा?
ज्या लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत नोंदणीसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी नोंदणी प्रक्रिया काळजीपूर्वक वाचावी व या योजनेचा लाभ घ्यावा. सर्वप्रथम पंतप्रधान आयुषमान भारत योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी जन सेवा केंद्रात (सीएससी) जा आणि आपल्या सर्व मूळ कागदपत्रांची एक प्रत जमा करा. यानंतर सर्व कागदपत्रांची जन सेवा केंद्र (सीएससी) च्या एजंटद्वारे पडताळणी केली जाईल आणि योजने अंतर्गत नोंदणी सुनिश्चित केली जाईल. आपल्याला नोंदणी प्रदान करतील. यानंतर १० ते १५ दिवसांनंतर आपल्याला जन सेवा केंद्राच्या माध्यमातून आयुषमान भारतचे गोल्डन कार्ड दिले जाईल. अशा प्रकारे आपली नोंदणी यशस्वी होईल.

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी आज ट्विट केले की, ही घोषणा करताना आनंद झाला कि आयुषमान भारतच्या माध्यमातून १ कोटी लोकांवर उपचार केले गेले. हा आणखी एक मैलाचा दगड पार केला आहे! त्यांनी पुढे लिहिले की, ‘Ayushman Bharat PMJAY: 1 Crore treatments & beyond’ वर आज एक विशेष वेबिनार मध्ये सहभागी व्हा, आज दुपारी २.३० ते ३.३० वाजता.

यापूर्वी बुधवारी हर्ष वर्धन यांनी एका निवेदनात म्हटले होते की, दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत देशातील गरीब कुटुंबातील एक कोटी रूग्णांना उपचार देणे ही आयुषमान भारत पीएमजेएवायसाठी एक मोठी उपलब्धी आहे. ते म्हणाले की, भारत सरकार आयुषमान भारत पीएम-जेएवायच्या सर्व ५३ कोटी लाभार्थ्यांना कोविड-१९ चे मोफत स्क्रीनिंग व उपचार उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.

पीएम मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे कि आयुषमान भारत लाभार्थ्यांची संख्या १ कोटीच्या वर गेली आहे. दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत या योजनेने मोठ्या संख्येत लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला आहे. त्यांनी या योजनेतील सर्व लाभार्थी व त्यांच्या कुटुंबातील लोकांना शुभेच्छा दिल्या व त्यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी आयुषमान भारतशी संबंधित सर्व डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी आणि इतर लोकांचे कौतुक करत म्हटले कि त्यांच्या प्रयत्नांनीच याला जगातील सर्वात मोठा आरोग्य सेवा कार्यक्रम बनवले आहे.