Ayushman Card-Omicron | ओमिक्रॉनचा कहर झपाट्याने वाढला ! संक्रमित झाल्यास आयुष्मान कार्डद्वारे मोफत उपचार होणार का? जाणून घ्या याच्याशी संबंधी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Ayushman Card-Omicron | देशवासीयांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने आयुष्मान भारत मिशन सुरू केले होते. ज्यामध्ये शासनाकडून पात्र लोकांना गोल्डन कार्ड दिले जाते. यामध्ये कार्डधारकाला कमाल 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात. त्याचबरोबर या कार्डचा थेट लाभ कामगार, गरीब व सामान्य कुटुंबातील व्यक्ती घेतात आणि अनेक गंभीर आजारांवर उपचार घेतात (Ayushman Card-Omicron).

अलीकडे, देशात कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट वेगाने पसरत आहे. अशा स्थितीत तुमच्या मनात प्रश्न येऊ शकतो की, या कार्डच्या मदतीने ओमिक्रॉनवर मोफत उपचार करता येतील का. अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात…

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत देशातील गरीब आणि दुर्बल घटकातील 10 कोटी कुटुंबांना आरोग्य सुविधांचा लाभ दिला जातो. ज्यामध्ये त्यांना 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा मिळतो. अशा स्थितीत यापैकी कोणाच्याही कुटुंबात ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला रूग्ण असेल तर त्यांना मोफत उपचार मिळणार आहेत. मात्र, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागेल. (Ayushman Card-Omicron)

पूर्ण कराव्या लागतील या अटी –

जे लोक गावात राहतात आणि त्यांचे घर कच्चे आहे, कुटुंबात प्रौढ व्यक्ती नसेल, कुटुंबाची प्रमुख महिला असेल, कुटुंबात अपंग व्यक्ती असेल, कुटुंब अनुसूचित जाती, जमाती किंवा भूमिहीन असेल, रोजंदारी मजूर आणि आदिवासी असतील तर त्यांना आयुष्मान भारत योजनेअंतर्गत मोफत कोरोना उपचाराची सुविधा मिळेल.

असे बनवू शकता आयुष्मान भारत गोल्डन कार्ड