‘बिग बी’ यांच्यासोबत काम करण्याबाबात आयुष्मान खुरानाने केले ‘मोठे’ वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आयुष्मान खुरानाने सगळ्या प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्याच्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये आपली खास ओळख निर्माण केली आहे. सध्या आयु्ष्मान खुराना आगामी चित्रपट ‘गुलाबो सिताबो’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटामुळे तो खूपच चर्चेमध्ये आला आहे.

https://www.instagram.com/p/ByU4pPegOQs/

या चित्रपटात आयुष्मान खुराना महानायक अभिताभ बच्चन यांच्या सोबत काम करणार आहे. या चित्रपटाबद्दल त्याने एक वक्तव्य केले आहे. त्याचे म्हणतो की, सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यासाठी मी खूप उत्साहित आहे.

आयुष्मान खुराना आणि अमिताभ बच्चन दोघेही पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. चित्रपट ‘विक्की डोनर’ चित्रपटानंतर आयुष्मान शुजीत सरकारसोबत दूसऱ्या चित्रपटात काम करणार आहे. आयुष्मानसाठी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणे खूप मोठी गोष्ट आहे.

एका मुलाखतीत अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याबद्दल आयुष्मानने सांगितले की, ‘मी बच्चनसाहेबांसोबत काम करण्यासाठी खूप नर्वस आणि उत्साहित आहे. मला खूप आनंद झाला आहे. एखादे स्वप्न पुर्ण झाल्यासारखे वाटत आहे. जेव्हा आपले स्वप्न पुर्ण होते तेव्हा आपलाल्या काय वाटते ? हे आपण शब्दात व्यक्त करु शकत नसतो. तसेच माझे झाले आहे. ‘

जेव्हा निर्मात्याने चित्रपट ‘गुलाबो सिताबो’ चित्रपटाची घोषणा केली होती तेव्हा आयुष्मानने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करुन आनंद व्यक्त केला होता. या चित्रपटाची शूटिंग लखनऊमध्ये होणार आहे. हा चित्रपट या नोहेंबरला प्रदर्शित होणार आहे. आयुष्मान खुरानाचा चित्रपट ‘आर्टिकल १५’ २८ जूनला प्रदर्शित होणार आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

पांढरे केस काळे करा, मध आणि लसूण आहे रामबाण औषध

हाडे बळकट बनवण्यासाठी ‘हे’ उपाय आवश्य करा

अर्धशिशी म्हणजे काय ? जाणून घ्या, करा हे उपाय

मनाची एकाग्रता वाढवायची आहे का ? करा ‘हे’ उपाय