‘लॉकडाऊन’मधील परिस्थितीवर आयुष्मान खुरानाची खास कविता ! म्हणाला – ‘माफी मागण्याची वेळ’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन :सध्या कोरोनामुळं देशात 21 दिवस लॉकडाऊन आहे. सध्या आपल्या फॅमिलीसोबत टाईम घालवरणारे कालाकारही सोशलवर सुपरअ‍ॅक्टीव दिसत आहेत. अभिनेता आयुष्मान खुराना यानं सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या स्थितीवर भाष्य करत एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामुळं तो चर्चेत आला आहे. या व्हिडीओत आयुष्मान एक कविता सादर करताना दिसत आहे. खास बात अशी की, ही कविता खुद्द आयुष्माननंच लिहिली आहे.

आयुष्माननं त्याच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत दिसत आहे की, आयुष्मान घराच्या बालकनीत आहे. सुरुवातीला तो त्याच्या बिल्डींगच्या बाजूचा रस्ता दाखवत आहे जो कधीच एवढा रिकामा नसतो. यावेळी त्यानं गरिबांना मदत करण्याचंही आवाहन केलं आहे. त्यांच म्हणणं आहे की, ही वेळ माफी मागण्याचा आहे. दुसऱ्यांसाठी चांगलं काही करण्याची ही वेळ आहे. देवाचं आभार मानण्याची ही वेळ आहे. यावर काहीतरी लिहिलेलंच त्यानं कवितेतून ऐकवलं आहे.

कविता ऐकवताना आयुष्मान म्हणतो, “गलतियाँ बक्श दें, गर बक्श सके. दौलत शोहरत भी उतनी दे जो पच सके. ले ले वापस हौसियत ज्यादा दिया हो गर तूने. बस ध्यान रहे कभी किरदार पे दाग ना लगे.”