‘शुभ मंगल सावधान’च्या सिक्वलमध्ये समलैंगिक प्रेमकथा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आयुष्मान खुराना चित्रपटसृष्टीत खुप प्रसिद्ध आहे. त्याने आतापर्यंत ‘विकी डोनर’,’शुभ मंगल सावधान’, ‘अंधाधून’, ‘बधाई हो’ यांसारखे सुपरहिट चित्रपट दिले आहे. यामध्ये त्याने चित्रपटातील भूमिका चांगल्या प्रकारे साकारली आहे. आयुष्मान खुराना याचा आगामी चित्रपट ‘शुभ मंगल सावधान’ याचा सिक्वेल येत आहे. चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

 

View this post on Instagram

😚😚😚

A post shared by AYUSHMANN KHURANA❤ (@ayushmann_fc) on

 

आयुष्मानच्या ‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याची माहिती चित्रपट व्यापर विश्लेषक तरण आदर्श यांनी व्टिटरद्वारे दिली आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचे नाव ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ असे असल्याचे देखील सांगितले आहे. हा चित्रपटाच्या शुटिंगला ऑगस्ट महिन्यात सुरुवात होणार असून हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटात आयुषमान सोबत कोणकोणते कलाकार असणार आहे. याची माहिती अजून मिळाली नाही. या चित्रपटात एका समलैंगिक युवाची कथा दाखविण्यात येणार आहे. तसेच चित्रपटात LGBTQ आणि कलम ३७७ याविषयी माहिती सांगण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल. रॉय करणार आहेत.

‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटाबद्दल आयुष्मान म्हणाला की, या चित्रपटाची कथा सगळ्यांच्या मनाला भावणारी आहे. त्याचबरोबर चित्रपट पाहताना प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद देखील दिसेल. चित्रपटाची कथा ही एक कॉमेडी अंदाजात असल्याचेही त्याने सांगितले.

Loading...
You might also like