home page top 1

‘या’ कारणामुळं रिलीजच्या आधीच आयुष्मानचा ‘ड्रीम गर्ल’ वादात

पोलीसनामा ऑनलाईन टीम  : आयुष्मान खुरानाचा ‘ड्रीम गर्ल’ हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये सध्या चर्चेत आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून आयुष्मान खुरानाचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. चित्रपटाचे प्रदर्शन जसजसे जवळ येत आहे, तशी लोकांमध्ये उत्सुकताही वाढत आहे. चित्रपटाची जोरात जाहिरातही केली जात आहे. मात्र या सर्वांच्या दरम्यान या चित्रपटासाठी एक वाईट बातमी येत आहे. ड्रीम गर्ल त्यांच्या चित्रपटाची कॉपी असल्याचा आरोप दिग्दर्शक जनक तोरानी यांनी केला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार –
ड्रीम गर्ल हा त्यांच्या २०१७ मधील ‘कॉल फॉर रन’ या चित्रपटाचा रीमेक आहे. या चित्रपटात देखील मुख्य भूमिकेने स्त्रीचे रूप धारण केले होते. ते म्हणाले की या स्क्रिप्टसह आपण दोनदा बालाजीच्या कार्यालयात गेले होते परंतु ते दोन्ही वेळा नाकारले गेले. त्यानंतर गेल्या वर्षी त्याला फायनान्सर मिळाला, त्यानंतर त्याने चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी सांगितले की त्यांची चर्चा प्रॉडक्शन हाऊसशी झाली असून एकता कपूर यात सहभागी नव्हती. अनेक नवसानंतरही ते बालाजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नचिकेत पंतवैद्य यांना भेटू शकले नाहीत.

जनक तोरानी म्हणाले की, जर ‘ड्रीम गर्ल’ आपल्या चित्रपटासारखाच असेल तर ते चित्रपटावर कायदेशीर खटला करतील. त्याला चित्रपटातील लेखकाचे हक्क आणि लेखक म्हणून त्याचे श्रेय देखील हवे आहेत.

दिग्दर्शकाकडून केल्या जाणाऱ्या या आरोपांवर ‘ड्रीम गर्ल’ चे दिग्दर्शक राज शांडिल्य यांनि प्रतिक्रिया दिली असून २०१० पासून या चित्रपटाची कल्पना असल्याचे राज शांडिल्य यांनी सांगितले. त्यांनी याची नोंददेखील केली आहे.

चित्रपटाविषयी बोलायचे झाल्यास राज शांडिल्य ड्रीम गर्लपासून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर, शोभा कपूर आणि आशिष सिंग यांनी केली आहे. हा चित्रपट १३ सप्टेंबर २०१९ रोजी प्रदर्शित होईल.

Loading...
You might also like