‘ह्या’ अभिनेत्याच्या पत्नीला झाला कॅन्सर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

बॉलिवूडला कोणाची नजर लागलीये हेच समजत नाहीये… सोनाली बेंद्रे कॅन्सर पासुन लढत असताना अजून एका बॉलिवूड घरात दुखाचे सावट निर्माण झाले आहे. हा अभिनेता व गायक दुसरा तिसरा कोणी नसून आयुष्मान खुराणा आहे. आयुष्मान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यपला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं समोर आलं आहे. ताहिराने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट वर ही धक्कादायक माहिती सर्वांना दिली आहे. दिलासादायक बाब म्हणजे ताहिराला कॅन्सर असल्याचं खुलासा प्राथमिक अवस्थेतच समजला. ताहिराने आपल्या पोस्टमध्ये माहिती दिली, “ब्रेस्ट कॅन्सर झिरो स्टेजवर असतानाच मला या गंभीर आजाराची माहिती मिळाली, काही दिवसांपूर्वी माझ्या उजव्या स्तनामध्ये डीसीआयएस झाल्याचं निदान झालं आहे. हा कॅन्सर झिरो स्टेजवर म्हणजेच सुरुवातीच्याच कॅन्सर स्टेज असल्याचे निदान झाल्याने तो विशिष्ट भागापुरता हा मर्यादित आहे.”

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4aab631c-c007-11e8-b357-1f1e8675280d’]

यापुढे ताहीरा लिहते की, महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरविषयी जागृती निर्माण व्हावी यासाठी मी ही पोस्ट लिहिली आहे. कॅन्सरवर सध्या उपचार घेत असून आपली प्रकृती ठिक असल्याचंही तिने सांगितलं आहे. अभिनेता आयुष्मान खुराणानेही आपल्या पत्नीच्या इन्स्टाग्राम पोस्टवर कमेंटमध्ये ‘माझी वॉरिअर प्रिन्सेस’, असं आयुष्मानने म्हटलं आहे. कॅन्सरच्या दुरधर आजाराने, सोनाली बेंद्रे आणि इरफान खान या बॉलिवूडमधील गुणी कलाकारांना ग्रासलं आहे. इरफान खान लंडनमध्ये आपल्या कॅन्सरवर उपचार घेत आहे. तर सोनाली बेंद्रे अमेरिकेत आपल्या आजारावर उपचार घेत आहे. दोघेही आपल्या प्रकृतीविषयीची माहिती चाहत्यांना नियमीत सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असतात.

[amazon_link asins=’B008V6T1IW,B01DEWVZ2C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’411c55f8-c007-11e8-ad95-6f89627ae631′]