Azaan On Loudspeaker | ‘महाविकास’चंही ठरलं ! अजानबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांचे मोठं वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Azaan On Loudspeaker | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्यावरुन केलेल्या वक्तव्यावरुन महाराष्ट्रात (Maharashtra) राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज ठाकरे यांच्या मागणीवर शिवसेना खासदार (Shivsena MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठे भाष्य केले आहे. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनीही (Home Minister) एक नोटीस जारी केली आहे. यामध्ये अजानच्या वेळी लाउडस्पीकरच्या (Azaan On Loudspeaker) आवाजाचा स्तर किती डेसिबल (Decibels) असावा, हे सांगितले असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

 

मशिदीत आवाज मोजण्याचे मशीन
कर्नाटकात (Karnataka) हिंदू संघटनांनी (Hindu Organizations) मशिदींवरील लाउडस्पीकर काढण्याची मागणी केली होती. यानंतर सरकारनेही त्यांच्या मागणीचे समर्थन केले होते. मात्र, याच बरोबर कायद्यानुसार कार्यवाही होईल, असेही सरकारने म्हटले होते. यानंतर कर्नाटक सरकारने (Government of Karnataka) सर्वच मशिदींना नोटीस बजावली आहे. यानंतर आता कर्नाटकात आवाज मोजणारे मशीन लावण्याची तयारी सुरु झाली आहे. (Azaan On Loudspeaker)

 

काय म्हणाले होते राज ठाकरे?
दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर (Shivaji Park Ground Dadar) आयोजित करण्यात आलेल्या
गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील लाउडस्पीकर काढण्याची मागणी केली.
तसेच हे लाउडस्पीकर काढले नाही, तर हिंदू मशिदींसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) म्हणतील.
राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर राज्यातील अनेक नेत्यांकडून त्यांच्यावर टीका केली.
त्यातच आता संजय राऊत यांनी अजान लाउडस्पिकर बाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

 

 

Web Title :- Azaan On Loudspeaker | sanjay raut big statement maharashtra home minister has also issued a notice stating how much decibel level should be there while observing azaan on loudspeaker

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Summer Weight Loss Tips | केवळ कडक उन्हापासूनच वाचवणार नाही, तर पोटाची चरबी आणि एक्स्ट्रा बॉडी फॅटसुद्धा कमी करतील ‘या’ 2 गोष्टी

 

Sainath Babar-Vasant More | पुणे मनसेच्या आजी-माजी शहराध्यक्षांची ‘चाय पे चर्चा’ ! वसंत मोरेंनी साईनाथ बाबर यांना दिल्या शुभेच्छा

 

Rohit Pawar on Sanjay Raut | रोहित पवारांचा संजय राऊतांना सल्ला; म्हणाले – ‘राजकीय नेत्यांनी शब्द जपून वापरावेत’