शरद पवारांचा मोदी सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘जनता सत्ता उलथवून लावल्याशिवाय राहणार नाही’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : ‘देशात वेगवेगळ्या राज्यातून शेतकरी दिल्लीत प्रचंड अभूतपूर्व शांततामय आंदोलन करत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपण इतक्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. ज्यांच्या हातात सत्ता आहे, पण त्यांना शेतकरी कष्टकरी किंमत नाही. शेतकरी रस्तावर बसला आहे पण पंतप्रधान मोदी यांनी साधी चौकशी केली का? पंजाबचा शेतकरी म्हणजे पाकिस्तानचा आहे का? साधा शेतकरी आहे तो, त्याची विचारपुस सुद्धा करावीशी वाटली नाही का? असा संतप्त सवाल शरद पवार यांनी विचारला. शेतकरी कायद्याविरोधात आझाद मैदानावर (azad maidan farmers protest) हजारोंच्या संख्येनं शेतकरी जमले आहे. शेतकऱ्यांना संबोधित करत असताना शरद पवार यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली.

‘ज्यांच्या हातात सत्ता आहे. त्यांना कष्टकऱ्यांबद्दल कवडीची आस्था नाही. कायदे करताना चर्चा होऊन एकमताने मंजूर केले जातात, चर्चा नाही समिती नाही, अशी भूमिका कायदा करताना केंद्र सरकारची राहिली, चर्चा न करता कायदा मंजूर केला, त्यामुळे जनता सत्ता उलथवून राहिल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टीकाही शरद पवार यांनी केली. ‘मोदी सरकारने (Modi Government) घटनेचा विचार न करता पायमल्ली करून कायदे केला, बहुमताच्या जोरावर कायदा केला. बहुमत डावलत कायदा केला तर जनता सत्ता उलथवून लावल्याशिवाय राहत नाही’, अशा शब्दांत राष्ट्रादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.

महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात असे राज्यपाल पहिल्यांदा भेटले. इतके शेतकरी भेटायला येणार त्यावेळेस निवेदन घेण्यासाठी सामारे जाणे गरजेचे होते. पण राज्यपालांना कंगना नावाच्या अभिनेत्रीला भेटायला वेळ आहे. शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही, अशी टीकाही शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर केली. ‘कायदा सुधारणा करायच्या असेल तर करता येईल, पण शेतकऱ्यांचा विचार करावा लागेल, असंही शरद पवार म्हणाले.