तुझ्या बापाच्या मैताला आलो आहे ; आझम खान यांचे पुन्हा बेताल वक्तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – समाजवादी पक्षाचे नेते आणि वादग्रस्त वक्तव्यासाठी कुप्रसिद्ध असणारे आझम खान यांनी पुन्हा एकदा बेताल वक्तव्य केले आहे. यापूर्वी अभिनेत्री जया प्रदा यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करणारे आझम खान पुन्हा एकदा त्यांच्या बेताल वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. मध्य प्रदेशात एका पत्रकाराने जया प्रदा यांच्यावर केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारला असता ‘तुझ्या बापाच्या मैताला आलोय’ असे आझम खान यांनी वक्तव्य केले आहे. याबाबतचा व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेने दिला आहे.

यापूर्वी जया प्रदा यांच्यावर आझम खान यांनी अश्लील भाषेत टीका केली होती. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. मध्य प्रदेशात माजी राज्यसभा खासदार मुनव्वर सलीम यांचे मध्य प्रदेशच्या विदिशामध्ये निधन झाले. तेव्हा श्रद्धांजली वाहण्यासाठी आझम खान गेले होते. यावेळी काही पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. यावेळी एका पत्रकाराने त्यांना जया प्रदा यांच्यावर केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारला. तेव्हा आझम खान यांनी ‘आपके वालिद के मौत पे आया था’ म्हणजेच तुझ्या बापाच्या मैताला आलो होतो असे रागाच्या भारत उत्तर दिले आणि ते थेट तिथून निघून गेले. आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आझम यांनी आणखी वादग्रस्त विधान करून आता मीडियाचा रोष ओढवून घेतला आहे.

You might also like