आक्षेपार्ह वक्‍तव्यावरून खा. आजम खान संसदेच्या बाहेर देखील ‘गोत्यात’, जया प्रदा केस प्रकरणी ‘चार्जशीट’ दाखल

लखनऊ : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीदरम्यान समाजवादी पक्षाचे खासदार आजम खान यांनी जयप्रदा यांच्यावर आक्षेपार्ह विधान केले होते. या प्रकरणी आजम खान विरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. १४ एप्रिल रोजी शहाबादमध्ये माजी मुख्यमंत्री आणि सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आजम खान यांच्या प्रचारार्थ सभा घेतली होती. या सभेत बोलताना आजम खान यांनी विरोधी उमेदवार जया प्रदा यांच्यवर अक्षेपार्ह विधान केले होते.

जिसको हम ऊंगली पकड़कर रामपुर लाए, आपने १० साल जिससे अपने इलाके का प्रतिनिधित्व कराया…उसकी असलियत समझने में आपको १७ बरस लगे, मैं १७ दिन में पहचान गया कि इनके… जया प्रदा या समाजवादी पक्षाकडून दोन वेळा खासदार झाल्या होत्या. २००४ आणि २००९ मध्ये रामपूर येथून त्या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर २०१० मध्ये पक्षविरोधी हालचालींमुळे त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले होते.

आजम खान यांनी केलेल्या विधानानंतर भाजपने त्यावर तीव्र आक्षेप घेतला होता. त्यानंतर देशभरात या वक्तव्यावरून देशभरात टीकेची झोड उठली होती. त्यानंतर महिला आयोगानेही आजम खान यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर स्थानिक प्रशासनानेदेखील याची दखल घेत शाहबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याप्रकरणी न्यायालयाने आजम खान यांच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like