समाजवादी पक्षाचे खा.आझम खान यांची Covid मुळे प्रकृती चिंताजनक !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे खान यांची प्रकृती अधिक चिंताजनक झाली आहे. आझम खान यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवले आहे. मुख्यतः म्हणजे खान यांना प्रति मिनिटाला तब्बल १० लीटर प्राणवायूची आवश्यकता भासत असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

आझम खान यांना सीतापूर तुरुंगात असतानाच कोरोना झाल्याने त्यांना तुरुंगातून लखनौच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या क्रिटिकल केअर टीमने खान यांची प्रकृती आणखी बिघडल्याने त्यांना कोविड ICU मध्ये दाखल केलं आहे. तेथे त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत. खान यांच्यासोबत त्यांचा मुलगा अब्दुल्लाह याचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तोही याच रुग्णालयात आहे.

आझम खान खान यांच्यावर क्रिटिकल केअर टीम देखरेख करत आहे. मागील आठवड्याभरापासून त्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. सुरुवातीला केलेल्या तपासणीमध्ये त्यांच्यामध्ये कोव्हिडचे मॉडरेट इंफेक्शन पाहायला मिळालं. त्यानंतर आता त्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. त्यांची ऑक्सिजन पातळी कमी असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मेदांता रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. राकेश कपूर यांनी दिली आहे. तसेच, डॉक्टरांनी आझम खान यांच्या मुलाची प्रकृती स्थिर आहे. मात्र, त्यालाही डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले आहे. असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

या दरम्यान, आझम खान सध्या उत्तर प्रदेशातील सीतापूर तुरुंगात ते कैद आहेत. त्यांच्यावर ५० हून जास्त गुन्हे दाखल आहेत. यांच्यासोबतच तुरुंगात कैद असणाऱ्या आणखी १३ कैद्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. असे समजते. तसेच, आझम खान आणि त्यांच्या मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती तुरुंग प्रशासनाने दिली आहे.