2 वर्ष रस्त्यावर ‘भीक’ मागत होता, घरचा मोबाइल नंबर आठवला तर निघाला ‘करोडपती’ !

हरियाणा : वृत्तसंस्था – ही गोष्ट फिल्मी वाटत असली तरी, नुकतीच हरियाणामध्ये ही आश्चर्यकारक घटना घडली आहे. अंबाला कँटच्या जुन्या धान्य बाजारात एक व्यक्ती मागील दोन वर्षांपासून भीक मागत होता. त्याला मोबाईल नंबर आठवल्यानंतर समजले की त्याचे खरे नाव धनंजय ठाकूर आहे, तो आजमगडचा राहणारा आहे, आणि दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ आहे. त्याचे वडील कोलकातामधील एका कंपनीत एचआर आहेत. धनंजयची बहीण नेहा त्याला नेण्यासाठी लखनऊहून आल्यानंतर सर्व गोष्टी उघड झाल्या.

गुरुवारची घटना आहे. धनंजय सिंहच्या पायाला जखम झाली. पायातून रक्त वाहताना पाहून गीता गोपाळ संस्थेचे सदस्य साहिल यांनी त्यास जवळ बोलावले आणि त्याच्या पायाला पट्टी बांधली. कुठला राहणारा आहेस, असे त्यांनी धनंजयला विचारले. यावेळी धनंजयला त्याच्या गावाचे नाव सांगता आले नाही. कारण, त्याची मानसिक स्थिती ठिक नव्हती. थोड्यावेळानंतर त्याला एक मोबाईल नंबर आठवला. हा नंबर आजमगडमध्ये लागला. कॉल कुणीतरी शिशुपाल यांनी उचलला आणि समजले की ते 2 वर्षांपूर्वी गायब झालेल्या धनंजयचे काका आहेत.

काकांनी धनंजयचे नाव लोकांना फोनवरून सांगितले. शुक्रवारी धनंजयची बहिण नेहा त्याला घेण्यासाठी लखनऊला आली. बहिणीला पाहताच धनंजयने तिला ओळखले. बहिणीने यावेळी एवढेच म्हटले की, फोन नंबर लक्षात होता तर 2 वर्षापूर्वी का नाही केला? धनंजयने ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतले आहे. बहिणीने सांगितले की तो सर्वांचा लाडका आणि हट्टी आहे. नशा करण्याची सवय लागल्याने त्याची मानसिक स्थिती बिघडली आणि एक दिवस त्याने घर सोडले.

कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्याचा खुप प्रयत्न केला पण थांगपत्ता लागला नाही. त्यानंतर बराच कालावधी लोटल्याने कुटुंबियांची आशा मावळली होती. परंतु, गुरूवार त्यांच्यासाठी चमत्कार घडला आणि कुटुंबातील हरवलेला सदस्य पुन्हा सापडला. धनंजय हा खुप सधन कुटुंबातील आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/