MahaShivratri 2020 : आता पोस्ट ऑफिसमधून मिळणार ‘गंगाजल’, महाशिवरात्रीला लागणार पहिला ‘स्टॉल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाशिवरात्रीच्या एक दिवस आधीपासून भारतीय पोस्ट ऑफिस ने गंगाजल विकण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारच्या योजने अतंर्गत हा प्रकल्प राबविला जात आहे. केंद्रातील मोदी सरकार महाशिवरात्रीच्या निमित्ताने सर्व शिवभक्तांना गंगाजल देऊन , श्रद्धाळू भाविकांच्या मनात आपली जागा मजबूत करत आहे. तसेच गंगाजल विकल्यामुळे उत्पन्न सुद्धा मिळणार आहे. सरकारच्या आदेशानुसार डाकघरांनी एक दिवस अगोदरच गंगाजल विकण्यासाठीचे स्टॉल हे भैरवनाथ मंदिर आणि डाकघरात लावले आहेत , अजून गरज पडल्यास अधिक स्टॉल लावले जाणार आहेत.

श्रद्धाळू भाविक महादेवाला करणार गंगाजलाने अभिषेक
पोस्ट ऑफिसच्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या योजने अंतर्गत हा उपक्रम राबविला जात आहे. सरकारच्या आदेशानुसार एक दिवस आधीच हे स्टॉल लावले गेले आहेत. त्या स्टॉलवरती २५० एमएल चे गंगाजल ३० रुपये किमतीने भाविकांना खरेदी करता येणार आहे. सामान्य नागरिक या सरकारच्या पुढाकारामुळे खूप उत्साही आहेत. गंगा नदी आणि गंगाजल हे लोकांसाठी अतिशय पवित्र आहे. सहसा आझमगडच्या लोकांना गंगाजल आणण्यासाठी वाराणसी किंवा प्रयागराज ला जावे लागते. सणाच्या दिवशी गंगाजल मिळाले नाही तर लोकं विहिरी आणि धरणातील पाण्याने जलाभिषेक करतात. महाशिवरात्रीच्या निमित्ताने हजारो नागरिक भैरवनाथाच्या मंदिरात महादेवाला जलाभिषेक करण्यासाठी येत असतात.

या वेळी सरकारने महादेवाला जलाभिषेक करण्यासाठी स्वत: पाणी पुरवण्याचे ठरवले असून , त्याची जवाबदारी पोस्ट ऑफिस वरती सोपविण्यात आलेली आहे. सरकारच्या आदेशाप्रमाणे भरवनाथ मंदिर आणि पोस्ट ऑफिस मध्ये गंगाजलचे स्टॉल उभे करण्यात आले आहेत. अधिक गरज पडली तर स्टॉलची संख्या वाढवण्यात येईल आणि यातून जे उत्पन्न गोळा होईल ते सरकारच्या खात्यात जमा केले जाईल .