धक्कादायक ! शरीरिक संबंधास नकार दिल्याच्या रागातून पत्नीचा खून, पतीनं मृतदेह पंख्याला लटकवला

आझमगढ : पोलीसनामा ऑनलाइन – उत्तर प्रदेशमधील आझमगढमध्ये पत्नीनं शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर पतीनं तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच या घटनेनंतर आरोपीने पत्नीच्या मृत्यूला आत्महत्येच स्वरूप देत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे.

दोन दिवसांपूर्वी आझमगढ जिल्ह्यातील मेहनाजपूर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात एका महिलेची संशयास्पद रित्या हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. पोलिसांनी सुरुवातीला केलेल्या तपासात महिलेच्या कुटुंबीयांनी त्याला आत्महत्या म्हटलं होतं. मात्र, अखेर मृतदेहाचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला. त्यामध्ये हा खून झाला असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं आणि लगोलग पतीला अटक करण्यात आली.

यासंदर्भात एसपी त्रिवेणी सिंह यांनी म्हटलं की, आरोपी राजूच्या पत्नीचे कोणाशी तरी गैरसंबंध असल्याचा त्याला संशय आला होता. या कारणामुळं पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते. यामध्येच दोन दिवसांपूर्वी पत्नीनं शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा नसल्याचं पतीला सांगितलं. यावरती पती राजू संतापला आणि त्याने रागाच्या भरामध्ये पत्नीची हत्या केली.

पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

पोलिस म्हणाले, पत्नीची हत्या केल्यानंतर राजूने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ही आत्महत्या असल्याचं दाखवलं. पत्नीची हत्या केल्यानंतर त्याने मृतदेह पंख्याला लटकवला. पोलिसांनी केलेल्या तपासणी दरम्यान त्यानं सांगितलं की, पत्नीने आत्महत्या केली आहे. मात्र, मृतदेहाचे पोस्टमार्टम झाल्यानंतर ही हत्या झाली असल्याचं समोर आलं. आझमगढ पोलिसांनी राजूला अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहे.