‘जैश ए मोहम्मद’चा म्होरक्या अजहर मसूदची तुरुंगातून सुटका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जैश ए मोहम्मदचा संस्थापक आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी अजहर मसूद यांची पाकिस्तानने प्रतिबंधात्मक तुरुंगातून सुटका केली असल्याचे वृत्त आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने अजहर मसूद याला १ मे २०१९ रोजी आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले होते. त्यानंतर पाकिस्तानने त्याच्यावर कारवाई करीत त्याला प्रतिबंधात्मक तुरुंगात ठेवले होते.
अजहर मसूद याला १९९४ मध्ये काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करत असताना पकडण्यात आले होते. त्याच्या सुटकेसाठी दहशतवाद्यांनी अनेक प्रयत्न केले होते. १९९९ मध्ये इंडियन एअरलाईन्सचे विमानाचे अपहरण करुन कंदाहारला नेण्यात आले. त्यावेळी प्रवाशांच्या सुटकेच्या बदल्यात अजहर मसूदसह ५ दहशतवाद्यांना सोडण्यात आले होते. त्यानंतर त्याने पाकिस्तानात जाऊन तेथून भारताविरुद्धच्या कारवाया सुरु ठेवल्या आहेत.

भारताने आता काश्मीरमधील ३७० कलम रद्द केल्याने अस्वस्थ झालेला पाकिस्तान काहीना काही कुरापती काढण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी अजहर मसूद याची तुरुंगातून सुटका केली असल्याचे सांगितले जाते.

आरोग्यविषयक वृत्त –