अझीम प्रेमजींनी ‘कोरोना’विरूध्द लढण्यासाठी दान केले 50 हजार कोटी ? सत्य की असत्य जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन टीम : कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अझीम प्रेमजींनी 50 हजार कोटी दान करण्याची घोषणा केली. अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी कोरोना विषाणूशी लढण्यासाठी 50 हजार कोटी दान करण्याची घोषणाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. यानंतर विप्रो कंपनीकडून या संदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले आहे. प्रेमजी यांनी कंपनीचे 52 हजार 750 कोटी किंमतीचे शेअर्स चॅरिटीला दान केले होते. एकूण संपत्तीच्या 34 टक्के भाग त्यांनी दान दिली होती. ही संपत्ती 2019 साली दान करण्यात आली होती.

जगभरात एवढी मोठी किमत चॅरिटीला देणारी अझीम प्रेमजी पहिले होते. सध्या असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण प्रेमजी यांच्याकडून देण्यात आले आहे. अझीम प्रेमजी फाउंडेशनचे शिक्षण क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान आहे. या संस्था देशातील अनेक क्षेत्रात कार्यरत असून त्या-त्या राज्य सरकारसोबत भागिदारी केली आहे. अजीम प्रेमजी फाउंडेशनचे कार्य देशाच्या उत्तर-पूर्व राज्यांशिवाय कर्नाटक, उत्तराखंड, राजस्थान, छत्तीसगड, पुदुत्चेरी, तेलंगाणा आणि मध्य प्रदेशाही विस्तारले आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी नक्कीच मोठ्या आर्थिक साहाय्याची गरज आहे.

अशावेळी देशातील नामांकित व्यावसायिक आणि उद्योजकांनी मदतीचा हात पुढे सरसावला आहे.महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजकडून 5 कोटी रुपयांची मदत करण्यात आली . रिलायन्सने कोरोनाबाधित रुग्णांसाठी 100 बेडचं सेंटर मुंबईमध्ये सेव्हन हिल्स या हॉस्पिटलमध्ये बनवले आहे. दोन आठवड्यात ते तयार करण्यात आले असून केवळ कोरोना ग्रस्तांसाठी असणारे ते देशातील पहिले रुग्णालय आहे.