B.Ed CET Exam Result | B.Ed अभ्यासक्रमाच्या ‘सीईटी’ परीक्षेचा निकाल जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  B.Ed CET Exam Result | महाराष्ट्रात राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे बी.एड प्रवेशासाठी ही परीक्षा 6 आणि 7 ऑक्टोबर दरम्यान घेण्यात आली होती. त्याचा निकाल (B.Ed CET Exam Result) आज (मंगळवारी) जाहीर झाला. बी.एड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षा म्हणजेच ‘सीईटी’ (CET) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये बी.एड सामान्य आणि विशेष (General and Special), त्याचबरोबर बीएड सीईटी ईएलसीटी या परीक्षांचा निकाल जाहीर केला गेला आहे.

 

बी.एड (जनरल ॲण्ड स्पेशल) सीईटी परीक्षेसाठी 52 हजार 213 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यातील 45 हजार 132 उमेदवारांनी परीक्षा दिली आहे.
परीक्षा दिलेले सर्वाच्या सर्व अर्थात 45 हजार 132 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजेच हे उमेदवार प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.
दरम्यान, बी.एड प्रवेशासाठी महाविद्यालयांतील प्रवेशासाठी केलेल्या अर्जदारांच्या मेरिटनुसार उमेदवारांना प्रवेश दिला जाणार आहे.

 

दरम्यान, बी.एड सीईटी ईएलसीटी परीक्षेसाठी (B.Ed CET LDC Exam) 23 हजार 386 उमेदवारांनी नोंदणी केली होती.
त्यातील 19 हजार 999 उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यातील 19 हजार 997 उमेदवार पात्र ठरले आहेत.

 

Web Title : B.Ed CET Exam Result | results of cet exam for bed admission announced

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nawab Malik | ‘दुसऱ्याची मालमत्ता जप्त करुन अजित पवारांचे नाव गोवण्याचे कारस्थान’ – नवाब मलिक

FDA | FDA ची धडक कारवाई, पुणे विभागात 34 औषध दुकानांना ठोकले टाळे

Bitcoin | 13 वर्षांचे झाले बिटकॉईन, सहा पैशांपासून सुरू केलेला प्रवास पोहचला 48.2 लाखांपर्यंत