#LokSabha : वंचित बहूजन आघाडीला मोठा धक्का ; माजी न्यायमुर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी काढला पाठिंबा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन- लोकसभा निवडणुकीसाठी एका झटक्यात तब्बल 37 उमेदवारांची घोषणा करणार्‍या वंचित बहूजन आघाडीला मोठा धक्‍का बसला आहे कारण उच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी त्यांना दिलेला पाठिंबा काढून घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधातील ठाम भूमिकेला आघाडी तडा देत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर सविस्तर भूमिका प्रसिध्द केली आहे.

वंचित बहूजन आघाडीचा बी.जी. कोळसे पाटील यांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. कोसळे पाटील यांनी त्यांच्या फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये असे म्हंटले आहे की ……….