वाघीरे महाविद्यालयास नॅककडून ‘बी++’ ग्रेड

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन (चंद्रकांत चौंडकर) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघीरे महाविद्यालयास बेंगळुरू येथील नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रिडिटेशन कौन्सिल (नॅक) या राष्ट्रीय संस्थेकडून ‘बी++’ ग्रेड (2.83 CGPA.) मिळाल्याबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्यावतीने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अॅड. संदीप कदम यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे तसेच आय क्यू ए सी समन्वयक डॉ. संजय झगडे, प्रा. दत्तात्रय सकपाळ, डॉ. नाना झगडे, डॉ. राजेश रसाळ, डॉ. स्वप्नील जगताप, डॉ. विद्या पाटणकर, एम.जी. जगताप, अमोल भोसले, संतोष लोणकर यांनी हा सत्कार स्वीकारला.

या प्रसंगी नॅक मूल्यांकनामुळे महाविद्यालयांची मुलभूत सुविधांबरोबर शैक्षणिक गुणवत्ता उंचावली आहे. नॅक मूल्यांकनामुळे महाविद्यालयांना गुणवत्ता टिकण्यास व ती वृद्धिंगत करण्याची संधी मिळते. चांगले मूल्यांकन मिळालेल्या महाविद्यालयांना स्वायत्ता मिळवून व्यवसायभिमुख अभ्यासक्रम सुरू करता येणे शक्य आहे. असे मत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अॅड. संदीप कदम यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपसचिव एल.एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव, प्राचार्य डॉ. पंडित शेळके, प्राचार्य डॉ.एम. जी. चासकर, प्राचार्य डॉ. टी. एन. साळवे, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ सेवक सहकारी पतसंस्थेच्याअध्यक्ष संगीता निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.