Baaghi 3 : ‘कमजोर’ सिनेमाची ‘दमदार’ सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

पोलीसनामा ऑनलाइन – अहमद खान दिग्दर्शित आणि टायगर श्रॉफ व श्रद्धा कपूर स्टारर बागी 3 हा सिनेमा शुक्रवार दि 6 मार्च 2020 रोजी थिएटरमध्ये रिलीज आहे. यात टायगरची जबरदस्त अ‍ॅक्शन दिसत आहे. हिट फ्रेंचायजी बागी या सिनेमाचा हा तिसरा सिनेमा आहे. या सिनेमात टायगर आणि श्रद्धा यांच्याव्यतिरीक्त रितेश देशमुख आणि अंकिता लोखंडे हे देखील प्रमुख भूमिकेत आहेत. सिनमाचे स्क्रीन प्ले फरहाद सामजीनं लिहिले आहेत. बहुतांश क्रिटीक्सला हा सिनेमा इम्प्रेस करू शकला नाही. सिनेमात गरजेहून अधिक मारधाड आणि अ‍ॅक्शन आहे. स्टोरीतही जास्त दम दिसत नाही.

असं सारं असतानाही सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगला बिजनेस करण्याची शक्यता वाटत आहे. हा सिनेमा जास्त स्क्रिनवर रिलीज झाल आहे. हा टायगरचा आतापर्यंतचता सर्वात वाईड रिलीज सिनेमा आहे. या सिनेमाला फक्त भारतातच 4400 स्क्रीन्स मिळाल्या आहेत. ओव्हरसीजमध्ये याला 1100 स्क्रीन्स मिळाल्या आहेत.

स्क्रीन्स रिलीज पाहता सिनेमा जास्त कमाई करेल असं सांगितलं जात आहे. अंदाज होता की, सिनेमा पहिल्या दिवशी 26 ते 28 कोटींची कमाई करेल. समोर आलेल्या माहितीनुसार सिनेमानं 22 कोटी कमावल्याचं सांगितलं जात आहे. अद्यााप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.