Baaghi 3 Social Media Review : ‘असा’ आहे ‘बागी 3’ ला प्रतिसाद, अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये तोडलं ‘तान्हाजी’चं रेकॉर्ड

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – अहमद खान दिग्दर्शित आणि टायगर श्रॉफ व श्रद्धा कपूर स्टार बागी 3 हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज आहे. यात टायगरची जबरदस्त अ‍ॅक्शन दिसत आहे. हिट फ्रेंचायजी बागी या सिनेमाचा हा तिसरा सिनेमा आहे. या सिनेमात टायगर आणि श्रद्धा यांच्याव्यतिरीक्त रितेश देशमुख आणि अंकिता लोखंडे हे देखील प्रमुख भूमिकेत आहेत. जाणून घेऊयात बागी 3 ला प्रेक्षकांचा आणि क्रिटीक्सचा प्रतिसाद कसा आहे.

मुंबईत बागी 3 ची स्क्रीनींग :

गेल्या रात्रीच मुंबईत सेलेब्ससाठी बागी 3 ची स्पेशल स्क्रीनींग ठेवण्यात आली होती. यात कपिल शर्मा, चंकी पांडे, रितेश देशमुख, डेजी शाह, संगीता बिजलानी, आदर जैन, तारा सुतारिया आदी सेलेब्स आले होते.

लोकांनी केलं बागी 3 चं कौतुक :

बागी 3 हा सिनेमा शानदार सिनेमा असल्याचं सोशल मीडियावर बोललं जात आहे. टायगरचे अ‍ॅक्शन सीन्स आणि परफॉर्मंसचं कौतुक होताना दिसत आहे. हा बेस्ट अ‍ॅक्शनमुव्ही असल्याचं म्हटलं जात आहे. चाहत्यांचा अंदाज आहे की, हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सहज एन्ट्री करू शकतो.

https://twitter.com/Just_ur_fan/status/1235763666869460992

UAE सेंसर बोर्डाच्या मेंबरनं बागी 3 ला दिले 4 स्टार :

बागी 3 या सिनेमाला सोशलवर शानदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे उमैर संधू नावाच्या युजरनं युएई सेंसर बोर्डच्या मेंबरच्या हवाल्यानं बागी 3 चा रिव्ह्यु दिला आहे. त्यानं ट्विट करत लिहिलं आहे की, “हा पुर्णपणे एक मसाला एंटरटेनर आहे. यात अ‍ॅक्शन सीन्सचा भडीमार आहे. पूर्ण फोकस एंटरटेंमेंटवर आहे. हा सिनेमा अलीकडे रिलीज झालेल्या सिनेमांमध्ये बेस्ट अ‍ॅक्शन सिनेमा आहे. हा सिनेमा ब्लॉकबस्टर आहे.” या सिनेमाला 4 स्टार देण्यात आले आहेत. हा सिनेमा पैसा वसूल सिनेमा आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. टायगरचंही कौतुक केलं आहे.

पहिल्या दिवशी रेकॉर्डतोड कलेक्शन करणार बागी 3 ?

ट्रेड अ‍ॅनलिस्टच्या मते बागी 3 पहिल्या दिवशी रेकॉर्डतोड कमाई करत खातं खोलू शकते. अंदाज लावले जात आहेत की, पहिल्या दिवशी सिनेमा 25 कोटींहून अधिक कमाई करू शकतो. असं झाल्यास हा सिनेमा बागी 2 च्या फर्स्ट डे कलेक्शनलाही मागे टाकेल. बागी 2 नं पहिल्या दिवशी 25.10 कोटी कमावले होते. मुव्हीचं लाईपटाईम कलेक्शन 164 कोटी होतं.

https://twitter.com/Hamzah_Bhuta/status/1235709834508546049

अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये तोडलं तान्हाजीचं रेकॉर्ड :

ट्रेड अ‍ॅनलिस्ट सुमित कडेल नुसार, बागी 3 सिनेमांच अ‍ॅडव्हान्स बुकिंग मोठ्या प्रमाणात झालं आहे. अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये सिनेमानं तान्हाजीचंही रेकॉर्ड तोडलं आहे. तान्हाजी सिनेमा 2020 मधील हाएस्ट अ‍ॅडव्हान्स बुकिंग रेकॉर्ड करणारा सिनेमा होता.