रशियाच्या TV वरील ‘बाहुबली 2’ च्या प्रसारणानं जिंकलं साऱ्यांचं मन, लोक म्हणाले – ‘बाहुबली आणि कटप्पासारखे भारत अन् रशिया !’

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  भारतीय सिनेमातील सर्वात यशस्वी सिनेमा बाहुबली 2 द कन्क्लूजन सिनेमाचं रशियात टेलीकास्ट केला गेला. रशियन टेलिव्हिजनवरील बाहुबली 2 चा असर सोशल मीडियावर दिसला. रशियन भाषेत डब केलेल्या सिनेमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर गाजताना दिसत आहे.

भारतातील रशियन दूतावासाच्या ट्विटर हँडलवरून व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यांनी लिहिलं की, भारतीय सिनेमे रशियात लोकप्रिय आहेत. पहा रशियाच्या टीव्हीवर सध्या काय सुरू आहे. बाहुबली रशियन व्हाईस ओव्हरसोबत.

यात बाहुबलीमधील तो सीन दाखवण्यात आला आहे ज्यात मंदिरात जाताना छेड काढणाऱ्याची बोटं देवसेना कापते आणि नंतर बाहुबली त्याचा गळा कापतो.

https://twitter.com/akhilnaithani/status/1265947393343791105?s=20

यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी काही प्रश्न विचारले. रशियाच्या दूतावासांनी याची उत्तरही दिली. एका युजरनं विचारलं की, गाणी कशी दाखवली जातात. यावर त्यांनी सांगितलं की, गाण्याच्या वेळी फक्त सबटायटल दाखवलं जातं.

एकानं विचारलं की, रशियन भाषेत मामाला काय म्हणतात. दूतावासांनी सांगितलं की, डियाडिया (Diadia). काहींनी तर कटप्पा आणि बाहुबली यांच्यातील बाँडिंगसाठी त्यांची तुलना भारत आणि रशियाच्या संबंधांसोबत करत आहेत.