पुर्वीपासून विवाहीत असलेल्या डायरेक्टरच्या प्रेमात पडली बाहुबलीची अभिनेत्री अनुष्का शेट्टी, घेणार 7 फेरे !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बाहुबली फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टी आणि अभिनेता प्रभास यांच्या अफेअरच्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहेत. दोघांच्या लग्नाबद्दलही अनेक बातम्या समोर आल्या आहेत. परंतु प्रभास आणि अनुष्का एकमेकांचे चांगले मित्र असल्याचं सांगतात. अलीकडेच अनुष्काच्या लव लाईफबद्दल अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. रिपोर्टनुसार अनुष्का शेट्टी डायरेक्टर प्रकाश कोवलामुडीसोबत लग्न करू शकते.

एका इंग्रजी वृत्तानुसार, अनुष्का शेट्टी प्रसिद्ध डायरेक्टर के राघवेंद्र राव यांचा मुलगा प्रकाश कोवलामुडी सोबत लग्न करण्याची शक्यता आहे. अद्याप अनुषकानं आपल्या पर्सनल लाईफवर मौन साधलं आहे. प्रकाश कोवलामुडीचं पहिलं लग्न रायटर कनिका ढिल्लन सोबत झालं आहे. 2014 साली हे कपल विवाहबद्ध झालं होतं परंतु नंतर दोघेही वेगळे झाले. दोघांच्या घटस्फोटाबद्दल अद्याप मात्र कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

https://www.instagram.com/p/B9M42gsgylY/

गेल्या वर्षी दोघांनी वेगळं झाल्याचं मीडियाला सांगितलं होतं. कनिकानं सांगितलं होतं की, ती दोन वर्षांपूर्वीच प्रकाशपासून वेगळी झाली आहे. प्रकाशबद्दल बोलायचं झालं तर कंगना रणौतच्या जजमेंटल है क्या या सिनेमाचं डायरेक्शन करत त्यानं बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं होतं. 2019 साली हा सिनेमा रिलीज झाला होता. कनिका या सिनेमाची रायटर होती. या सिनेमात दोघांनी एकत्र काम केलं आहे. कनिका आणि प्रकाश वेगळे झाले असले तरी दोघांमध्ये मैत्री कायम आहे.

https://www.instagram.com/p/B8zRx5MAG_b/

समोर आलेल्या माहितीनुसार, अनुष्का आणि प्रकाश यांची भेट ‘साईज झिरो’ या सिनेमाच्या शुटींगदरम्यान झाली होती. दोघांच्या नात्याबद्दल अद्याप अनुष्कानं मात्र काहीही स्टेटमेंट दिलेलं नाही. समोर आलेल्या रिपोर्टमध्ये किती सत्य आहे अद्याप समजलेलं नाही.

https://www.instagram.com/p/B8mVKtIg7G7/

https://www.instagram.com/p/B8REc-kAypb/

https://www.instagram.com/p/B8RB8B2gTaf/