Video: प्रभाससोबत फोटो काढल्यानंतर ‘त्या’ तरुणीने केले असे काही ‘ते’ पाहून प्रभासही झाला अवाक

वृत्तसंस्था : अनेकवेळा चाहते आपल्या आवडत्या कलाकारानं विषयी प्रेम व्यक्त करतात. जर तो आवडता कलाकार आपल्या समोर अचानकपणे आला तर आपण काय करावं आणि काय नाही असे या चाहत्यांना होत असतं. असाच एक मजेशीर किस्सा अभिनेता प्रभासच्या बाबतीत घडला आहे. पभासच्या चाहतीने भर विमानतळावर काय केले हे पाहून तुम्हालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही.

प्रभास त्याच्या आगामी ‘साहो’ चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या काही दृष्यांच्या चित्रिकरणासाठी प्रभास लॉस एंजेलिसला गेला होता. तेथील विमानतळावर उतरल्यावर त्याच्या काही चाहत्यांनी त्याला घेरले. याच चाहत्यांमधील एका तरुणीने प्रभासला पाहिल्यानंतर आनंदाने उड्याच मारु लागली. या तरुणीने प्रभासबरोबर फोटो काढल्यावर लाडात त्याच्या गालावर एक चापटी मारली. आपल्या आवडत्या कलाकाराबद्दल प्रेम व्यक्त करण्याच्या या अनपेक्षित पद्धतीमुळे प्रभासही थोडा घाबरला. काही पावले मागे झाला आणि त्यानेही आपल्या गालावरुन हात फिरवला हा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/p/BunP8kVnvDS/?utm_source=ig_embed

काही दिवसांपूर्वी प्रभास करण जोहरच्या कॉफी विथ करण कार्यक्रमामध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी करणने त्याला महिला चाहत्यांकडून मिळणाऱ्या वागणुकीबद्दल प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना प्रभासने, ‘त्यांनी दूर राहून माझ्यावर प्रेम केल्यास मला काहीच हरकत नाही’ असं मत व्यक्त केलं होतं.पण असे अचानकपणे चाहतीने प्रेम व्यक्त केल्यामुळे प्रभासही अवाक् झाला हे या व्हिडीओ मधून दिसतच आहे.

लवकरच प्रभासचा ‘साहो’ चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे सुजीत सरकार दिग्दर्शक असून हा चित्रपट तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये रिलीज होणार आहे.या चित्रपटात श्रद्धा कपूरशिवाय नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, चंकी पांडे, महेश मांजरेकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे.