‘बाहुबली’ फेम तमन्ना भाटीयानं पाकिस्तानी क्रिकेटरसोबतच्या लग्नाच्या बातम्यांवर दिली ‘ही’ प्रतिक्रिया

पोलिसनामा ऑनलाइन –बाहुबली फेम अ‍ॅक्ट्रेस तमन्ना भाटीया गेल्या काही दिवसांपासून आपल्या खासगी जीवनामुळं चर्चेत येत आहे. असाही अंदाज लावला जात होता की, माजी पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रज्जाकसोबत ती लग्न करणार आहे. परंतु या सगळ्यावर आता प्रतिक्रिया देत तमन्नानं याला पूर्णविराम दिला आहे.

तमन्ना म्हणते, “आपल्याकडे कधीही कुणाचंही नाव कुणाशीही जोडलं जातं. कधी तो एक अ‍ॅक्टर होता, क्रिकेटर होता, आता डायरेक्टर आहे. मला प्रेम वगैरे आवडंत. परंतु जेव्हा माझ्या खासगी आयुष्याचा विषय असेल तेव्हा मी अशा आधारहीन बातम्यांचं समर्थन करत नाही.”

https://twitter.com/30Kumaar/status/1258275296458964992?s=20

तमन्ना पुढे म्हणते, “मी सिंगल आहे आणि खुश आहे. माझे कुटुंबीयदेखील माझ्यासााठी मुलगा पहात नाहीयते. सध्या माझं कामच माझ प्रेम आहे. मी चकित झाले की, अशा अफवा उडतातच कशा. हे पूर्वग्रहानं ग्रसित आणि अपमानकारक आहे. जर असं काही असेल तर मी सर्वात आधी याबद्दल नक्की सांगेन”

फोटोमागील सत्य

काही दिवसांपूर्वी तमन्ना आणि अब्दुल यांचा ज्वेलरी शॉपमधील एक फोटो समोर आला होता. ज्यानंतर त्यांच्या लग्नाच्या बातम्या समोर येऊ लागल्या. 2017 मधील हा फोटो दुबईमधील एका ज्वेलरी शॉपमधील आहे. तमन्ना आणि रज्जाक ज्वेलरी शॉपच्या ओपनिंगला तिथे पोहोचले होते.