Baal Aadhaar card | नवजात बालकाचं आधार कार्ड काढायचंय? तर मग बघा सोपी प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Baal Aadhaar Card | भारतीय नागरीकांचे महत्वाचे दस्तऐवज म्हणजे आधार कार्ड झालं आहे. कोणत्याही कामात आधार कार्डची (Aadhaar card) सक्ती केली आहे. अनेक शासकीय कामात आधार कार्ड असणे आवश्यक असते. त्याचबरोबर अनेक योजनांचा लाभ देखील आपण आधार कार्ड असल्यावर घेऊ शकतो. दरम्यान, आधार कार्ड बाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. UIDAI ने लहान बाळांचे आधार कार्ड (Baal Aadhaar Card) बनवण्याच्या नियमात बदल केलाय. त्याप्रमाणे जन्मदाखला किंवा हॉस्पिटल डिस्चार्जसह स्वतःची कागदपत्रं देऊन पालक बाल आधार कार्डासाठी अप्लाय करु शकणार आहेत.

हे कागदपत्र लागतील…

5 वर्षांखालील लहान बाळांसाठी…(Baal Aadhaar Card) बाल आधारसाठी पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लाइसेंस (Driving license), रेशन कार्ड किंवा सार्वजनिक वितरण प्रणाली फोटो कार्ड, मतदान आयडी, शस्त्राचे लायसन्स, भारत सरकारद्वारे जारी फोटो आयडी प्रूफ, मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेचे ओळखपत्र, PSU द्वारे जारी सर्व्हिस फोटो आयडी कार्ड, नरेगा रोजगार कार्ड, फोटो क्रेडिट कार्ड, पेंशनर फोटो कार्ड, स्वातंत्र्य सैनिक पोटो कार्ड, शेतकरी पासबुक, CGHS फोटो कार्ड, लग्नाचा पुरावा, नावात बदल केल्याचा पुरावा, ECHS फोटो कार्ड, राजपत्रित अधिकारी अथवा तहसीलदारद्वारे जारी केलेले ओळखपत्र, राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश किंवा प्रशासनाने जारी केलेले अपंगत्व प्रमाणपत्राची आवश्यकता आहे.

Petrol Diesel Price Today | डिझेलच्या दरात मोठी वाढ, पेट्रोलही महागले; जाणून घ्या नवीन दर

पत्त्याच्या पुराव्यासाठी…

बँक पासबुक, बँक स्टेटमेंट, पोस्ट ऑफिस अकाउंट स्टेटमेंट, पालकांचा पासपोर्ट, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स (Driving license), रेशनकार्ड, पीएसयूद्वारे जारी सर्व्हिस फोटो आयडी कार्ड, 3 महिने जुने वीज बिल, 3 महिने जुने पाणी बिल, टेलिफोन लँडलाइन बिल, करपावती, क्रेडिट कार्ड स्टेटमेंट, विमा पॉलिसी, बँकेद्वारे सही असलेल्या लेटर हेडवर फोटो व पत्ता, ऑफिसद्वारे जारी लेटर हेडवर पत्ता-फोटो, नरेगाचे रोजगार कार्ड, शस्त्र लायसन्स, पेंशन कार्ड, स्वातंत्र्य सैनिक कार्ड, शेतकरी पासबुक, CGHS कार्ड, ECHS कार्ड, आयकर विभागाने केलेली पडताळणी, वाहन नोंदणी प्रमाणपत्र, भाडेकरार, राज्य सरकारद्वारे जारी रहिवासी दाखला, 3 महिने जुने Gas connection bill ही कागदपत्रं आवश्यक आहेत. यापैकी काही कागदपत्रे पुरावा म्हणून योग्य असणार आहेत.

काय आहे प्रक्रिया?

– बाल आधार कार्ड (Child Aadhaar card) बनवण्यासाठी सर्वात प्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जा.

– येथे आधार कार्ड नोंदणी पर्याय निवडा.

– तुम्हाला आवश्यक ती माहिती भरावी लागेल. यात बाळाचे नाव व अन्य बायोमेट्रिक माहितीचा समावेश असेल.

– पत्ता, राज्य इत्यादी माहिती भरा.

– तुम्हाला आधार कार्ड Child Aadhaar card) नोंदणी शेड्यूल करण्यासाठी अपॉइंटमेंट पर्यायावर क्लिक करावे लागेल.

– शेवटी तुम्हाला जवळील नोंदणी सेंटरची निवड करावी लागेल.

– त्यानंतर तारीख व वेळ निवडा. निवडलेल्या तारखेला जाऊन तुम्ही आधार तयार करु शकणार आहे.

हे देखील वाचा

Supreme Court | ‘खंडणी’ गोळा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना कारागृहात टाकायला हवे – सुप्रीम कोर्ट

Pune News | मौलाना कलीम सिद्दीकी यांच्यावरील कारवाईच्या विरोधात मुस्लिम संघटनांचा बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन

Crypto Currencies | संपूर्ण जगात हजारो ‘क्रिप्टोकरन्सी’ पण ‘या’ 10 ‘प्रमुख’, ज्यांच्याबाबत सर्वांना माहित असणे आवश्यक; होईल मोठा ‘नफा’, जाणून घ्या

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Baal Aadhaar Card | how to apply for baal aadhaar card online for your children check details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update