‘रोमँटीक’ गाणं ‘बारिश’ रिलीज, कमजोर गाण्यात ‘बेरंग’ दिसली ‘पारस-माहिरा’ची केमिस्ट्री (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉस 13 चा एक्स स्पर्धक पारस छाबडा आणि माहिरा शर्मा यांचा म्युझिक व्हिडीओ बारिश कालच म्हणजेच मंगळवारी 10 मार्च 2020 रोजी होळीच्या निमित्तानं रिलीज झाला. गाण्यात पारस आमि माहिरा यांची कमजोर केमिस्ट्री दिसत आहे. पारस आणि माहिराचा रोमँस कमी आणि त्रासच जास्त दिसत आहे. दोन प्रेमींच्या जीवनात विरह आला आहे अशा दोन प्रेमींवर हे गाणं आहे. ज्यात त्यांना होणारा त्रास दाखवण्यात आला आहे.

काय आहे गाण्यात ?

व्हिडीओत दाखवलं आहे की, पारस आणि माहिराचं लग्न होणार असतं. तेव्हाच पोलीस पारसला पकडून नेतात. पारसपासून दूर होणारी माहिरा आपला जीव गमावते. जेव्हा तो जेलमधून सुटतो तेव्हा माहिराचा मृत्यू होतो. जेव्हा तो माहिराच्या कबरकडे जातो तेव्हा त्याची आण तिच्या आत्म्याची भेट होते. गाणं तसं तर युट्युबच्या टॉप 4 मध्ये ट्रेंड करताना दिसत आहे. परंतु गाण्याची जादू काही चालली नाही असं दिसत आहे.

गाण्याबद्दल सांगायचं झालं तर हे गाणं टोनी कक्करनं लिहिलं आहे. निखिल डिसूजा आणि सोनू कक्करनं गाणं गायलं आहे. तर अंशुल गर्गनं गाणं प्रोड्यूस केलं आहे. विनय पालनं एडिटींग केलं आहे. बारिशों में आसुओं का पता नहीं चलता असे या गाण्याचे बोल आहेत. गाण्याला इमोशनल टच देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु तसा फील काही येत नाही. या गाण्याला चाहत्यांचा संमिश्र प्रतिसाद आहे.