‘बाबा का ढाब्या’चा मालक झाला लखपती; पोलिसांनी मांडला हिशोब
नवी दिल्लीः पोलीसनामा ऑनलाईन – बाबा का ढाबा वाद प्रकरणी (Baba Ka Dhaba Controversy) दिल्ली पोलिसांनी साकेत कोर्टात स्टेटस रिपोर्ट दाखल केला आहे. यात पोलिसांनी म्हटले आहे की, बाबाच्या बँक खात्यात 42 लाख आले होते. ढाब्याचे मालक कांता प्रसाद (Kanta Prasad) यांनी कोर्टात याचिका दाखल करत आपला हिशोब मागितला होता. दुसरीकडे याप्रकरणी दिल्ली पोलिस यूट्यूब गौरव वासान यांच्या बँक खात्याचा तपास करत आहे. याप्रकरणी कोणालाही अटक झाली नाही, तसेच चार्जशीटही दाखल केली नाही.
यू-ट्यूबर गौरव वासान याने सोशल मीडियावर आपले आणि आपल्या पत्नीचे अकाऊंट शेअर केले होते. गौरवने सर्व पैसे बाबाला दिल्याचा दावा केला होता, पण 4.20 लाख रुपयांप्रकरणी वाद निर्माण झाला होता. यामुळे फसवणूक प्रकरणी बाबाने मालवीय नगर पोलिस ठाण्यात गौरव विरोधात FIR दाखल केली होती. गौरवने अनेक बँक खाते शेअर केले आहेत, त्या सर्व खात्यांचा तपास सुरु आहे.
बाबा कांता प्रसाद यांनी मालवीय नगरमध्ये एक रेस्टॉरेंट सुरु केले आहे. जेथे ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे. कांता प्रसाद यांचे म्हणणे आहे की, अजून ग्राहक कमी आहेत. पण, ऑनलाईन पद्धतीने ऑर्डर सुरु झाले आहेत. त्यात काही दिवसांपूर्वी बाबा कांता प्रसाद यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचा दावा त्यांनी केला होता. कांता प्रसाद म्हणाले होते की, धमकी देणारा व्यक्ती स्वत:ला गौरव वासानचा भाऊ सांगत होता. दरम्यान, ट्यूबर गौरव वासान याने कांता प्रसाद यांचा रडत असलेला एक व्हिडिओ तयार केला होता. त्यानंतर बाबा का ढाबा प्रसिद्धीच्या झोतात आला. त्यानंतर अनेकांनी कांता प्रसाद यांना पैशांची मदत केली होती. त्यामुळे साधा ढाबा चालवणाऱ्या कांता प्रसाद यांनी आता हाय फाय ढाबा उघडला असून त्यांचा काउंटरवर बसलेला फोटोही व्हायरल झाला आहे.
नव्या रेस्टॉरंटसाठी ते महिन्याला 35 हजार रुपयांचे भाड भरतात. कांता प्रसाद यांच्या नव्या ढाब्यात सीसीटीव्ही कॅमेरेही लावले आहेत. यामध्ये ढाब्यात येणाऱ्या ग्राहकांवर आणि कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवता येतं. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नव्या ढाब्यात वेगवेगळ्या प्रकारची पेंटिंग्ज लावली आहेत.