बलात्कार, अपहरण करणारा आरोपी बाबा नित्यानंद देश सोडून पळाला, 9 आणि 10 वर्षाच्या मुलांकडून आश्रमाचा ‘पर्दाफाश’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : गुजरात पोलीस ने गुरुवार (२१ नोव्हेंबर) रोजी सांगितले की, ढोंगी बाबा नित्यानंद हा देश सोडून पळाला आहे. नित्यानंद विरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी नित्यानंद च्या विरुद्ध पुरावे जमा करण्यासाठी पोलिसांनी आश्रमातील त्यांच्या दोन महिला अनुयायींना अटक केली आहे. अनुयायांकडून देणग्या गोळा करण्यासाठी मुलांचे अपहरण केले होते. या आरोपाखाली अहमदाबादमध्येत त्यांचे योगिनी सर्वज्ञपीठम चालवल्याचा आरोप पोलिसांनी बुधवारी केला.

पीडित मुलांनी सांगितले की, १० दिवसांपासून त्यांना बंदी बनवून डांबून ठेवण्यात आले

पोलिसांनी दोन महिला अनुयायींना अटक केली आहे, साध्वी प्राण प्रियानंद आणि प्रियातत्व रिद्धि किरण असे त्यांचे नाव असून त्यांच्यावर कमीत कमी चार मुलांचे अपहरण करून त्यांना एक फ्लॅटमध्ये डांबून ठेवल्याचा आरोप आहे. आश्रमासाठी वर्गणी एकत्र करण्यासाठी या मुलांचा वापर केला जात होता. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, एका फ्लॅट आणि योगिनी सर्वज्ञापीठम आश्रम मधून मुक्त करण्यात आलेल्या चार मुलांचा जबाब पोलिसांनी नोंदून घेतला असून त्यानंतर नित्यानंद विरद्ध गुन्हा नोंदला गेला. तसेच त्यांनी सांगितले की साध्वी प्राण प्रियानंद आणि प्रियातत्व रिद्धि किरण यांच्यावर आश्रम चालवण्याची जबाबदारी होती.

पोलिसांनी सांगितले की, “आश्रमातील ९ ते १० वर्षाच्या दोन मुलांनी सांगितले की, त्यांना खूप त्रास देखील दिला जात होता आणि बालकामगार म्हणून त्यांच्याकडून काम करवून घेतले जात होते. शहरातील एका फ्लॅटमध्ये त्यांना १० दिवसांपेक्षा जास्त दिवसांपासून बंदी बनवून ठेवले होते. या आरोपांवरून स्वामी नित्यानंद याच्या दोन अनुयायींना अटक करण्यात आली.”

भारतात आल्यावर बाबा नित्यानंदास केली जाईल अटक : गुजरात पोलीस

अहमदाबाद (ग्रामीण) पोलीस अधीक्षक एस. वी. असारी यांनी सांगितले की, नित्यानंद विदेशात पळून गेला आहे. गरज पडल्यास गुजरात पोलीस उचित माध्यमांद्वारे नित्यानंद यास अटक करण्यात यशस्वी होतील. दरम्यान नित्यानंद च्या विरुद्ध कर्नाटक मध्ये बलात्काराविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता तेव्हाच नित्यानंद देश सोडून पळाला होता त्यामुळे इथे शोधाशोध करण्यात वेळ वाया जाऊ शकतो.

असारी यांनी सांगितले की, “गरज पडल्यास उचित माध्यमांद्वारे नित्यानंद याला अटक करण्यात आम्ही यशस्वी होऊ. नित्यानंद भारतात आल्यास त्याला आम्ही निश्चित अटक करणार.” पोलिसांनी मंगळवारी साध्वी प्राण प्रियानंद आणि प्रियातत्व रिद्धि किरण या नित्यानंद यांच्या अनुयायींना गिरफ्तार केले होते. त्या दोघींवर कमीत कमी चार कमीत कमी चार मुलांचे अपहरण करण्याचा आरोप करून त्यांना एका फ्लॅट मध्ये बंदी म्हणून डांबून ठेवण्याचा आरोप आहे.

ग्रामीण न्यायालयाने बुधवारी सायंकाळी या दोन्ही महिलांना पाच दिवसांच्या कोठडी मध्ये पाठवले असून उपअधीक्षक (अहमदाबाद ग्रामीण) के. टी. कमरिया त्यांची विचारपूस करत आहेत. त्यांनी सांगितले की, पोलीस नित्यानंद च्या आश्रमातून गायब झालेल्या एका महिलेच्या प्रकरणाचा देखील तपास चालू आहे. महिलेचे वडील जनार्दन शर्मा यांनी विवेकानंद पोलीस स्टेशन मध्ये याबाबत केस नोंदवली होती.

या दरम्यान, गुजरात चे गृहमंत्री प्रदीप सिंह जडेजा यांनी सांगितले की, या प्रकरणातील कोणत्याही व्यक्तीला मोकळे सोडले जाणार नसून सगळ्यांवर कारवाई केली जाईल. तसेच त्यांनी सांगितले की या तपासकार्यासाठी संबंधित एसपी यांना एक टीम तयार करण्यास सांगितली आहे, “डीजीपी यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी संबंधित एसपी यांना एक टीम बनवण्यास सांगितले असून या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीवर कारवाई करण्याचे सांगितले आहे.”

Visit : Policenama.com