जीवे मारण्याची धमकी दिली ‘ढोंगी’ बाबानं, 2 अल्पवयीन बहिणींवर आश्रमात ‘बलात्कार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रायपूर राणीमधील त्रिलोकपूरमध्ये हिमाचल प्रदेशच्या दोन अल्पवयीन मुलींसोबत लैगिंक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी महिला पोलिसांनी एका आरोपी बाबाला अटक केली आहे. आरोपी बाबाला शुक्रवारी पंचकुला न्यायालयात हजर करण्यात आले. बलात्काराची ही घटना छोटा त्रिलोकपूर आश्रमामध्ये घडली. या घटनेतील पीडित मुली 12 आणि 14 वर्षांच्या आहेत. मंगळवारी रात्री पंचकुला पोलीस स्थानकात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपीच्या चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे झाले. बाबाने सांगितले की मुलींना भूताची भीती दाखवून बलात्कार केला. बाबा म्हणाला की त्यांनी त्याचे ऐकले नाही तर तो त्यांच्यावर भूत सोडेल.

पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकारी म्हणाल्या की, हरियाणाच्या कालकाच्या राजपूर राणी मध्ये छोटा त्रिलोकपूर आश्रमात हा प्रकार घडला. हिमाचलमधील दोन मुली आपल्या भावासह आश्रमात गेल्या होत्या. दोन्ही मुलींकडून आरोप करण्यात आला ही त्यांच्यावर तीन दिवस अत्याचार करण्यात आला. या दरम्यान त्यांना दुसऱ्या खोलीत ठेवण्यात आले आणि भावाला भेटू दिले नाही.

पीडीत मुलींच्या आधारे हे प्रकरण दाखल करण्यात आले होते. पोलीस महिला अधिकारी म्हणाल्या की, अल्पवयीन मुलींचे म्हणणे आहे की त्यांना आश्रमात सेवा करण्यासाठी बोलवण्यात आले होते. एफआयआर दाखल केल्यानंतर पीडित मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.