पी. चिदंबरम यांच्यानंतर आता राहुल आणि सोनिया गांधींचा नंबर : रामदेव बाबा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोएडा येथे एका खाजगी संस्थेमध्ये आलेल्या योगगुरू रामदेव बाबा यांनी काँग्रेसवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. त्यांनी काँग्रेस परिवारावर आरोप करताना म्हटले आहे की गांधी परिवाराला हवे होते की अमित शहा यांचे जीवन जेलमध्येच संपावे.

कायद्याचे उलंघन करणाऱ्याचे पी. चिदंबरम यांच्यासारखेच हाल होणार आहेत. तसे यावेळी बोलताना रामदेव बाबांनी मोदी सरकारच्या कामांचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणले हे सरकार भ्रष्टाचार विरोधात कठोरतेने पाऊल उचलत आहे.

सेक्टर 62 येथील सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये रामदेव बाबा आले होते या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जो पण कायदा तोडेल तो जेलमध्ये जाईल असे स्पष्ट मत यावेळी त्यांनी मांडले. तसेच चिदंबरम यांच्यानंतर आता राहुल गांधी आणि सोनिया गांधींचा जेलमध्ये जाण्याचा नंबर आहे.

Visit : policenama.com