Baba Ramdev And Corona Vaccine : कोरोना प्रतिबंध लस घेणार का? बाबा रामेदव यांनी दिलं ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली : देशात कोरोनाचे संकट असताना काही दिवसापूर्वी आयुर्वेदाचा पुरस्कार करणाऱ्या बाबा रामदेव यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे होमिओपॅथी विरुद्ध अ‍ॅलोपॅथी असा वाद सुरू झाला होता. त्यानंतर आता बाबा रामदेव Baba Ramdev यांना कोरोना प्रतिबंधक लस घेणार का अशी विचारणा केली असता त्यांनी आपण लस घेणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की २१ जूनपासून देशातील प्रत्येक राज्यामध्ये १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस मोफत देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यांनी उचललेल्या या पावलामध्ये मी सुद्धा भागीदार होणार असल्याचे बाबा रामदेव Baba Ramdev यांनी म्हंटले आहे.

बाबा रामदेव म्हणाले की, योग आणि आयुर्वेदाचा समावेश केला पाहिजे. आजारपणांसमोर एखाद्या ढालीप्रमाणे योग आहे. कोरोनामुळे निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीपासून रक्षण करण्याचे काम योग करते. मात्र शस्त्रक्रिया आणि आणीबाणीच्या परिस्थितीत अ‍ॅलोपॅथी ही सर्वश्रेष्ठ उपचार पद्धती आहे असे सांगत त्यांनी कुठल्याही संघटनेला तसेच उपचारपद्धतीला विरोध नसल्याचे स्पष्टीकरण दिले.

एवढेच नाही तर बाबा रामदेव यांनी आपली लढाई तर ड्र्ग माफियांविरोधात असल्याचेही म्हंटले आहे. देवदूताप्रमाणे डॉक्टर आहेत परंतु अनावश्यक औषधे आणि उपचारांच्या नावाखाली कुणाचेही शोषण करता कामा नये. लोकांना कमी खर्चात औषधे उपलब्ध होण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान जनऔषधी केंद्र सुरु केले आहेत त्याचेही कौतुक केले.

काही दिवसांपूर्वी बाबा रामदेव यांनी डॉक्टरांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये केली होती.

त्यावरुन वाद सुरु असताना आयएमए आणि बाबा रामदेव यांच्यात ऍलोपॅथीवरून वाद सुरू झाला होता.

आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनीही त्यांना पत्र लिहून त्यांनी केलेल्या विधानांवर आक्षेप घेतला होता.

बाबा रामदेव यांच्याविरोधात अनेक शहरांमध्ये तक्रारीही दाखल करण्यात आल्या होत्या.

 

Pune Crime News | गुन्हे शाखेकडून तडीपार गुंड शफ्या खानला येरवडा गावठाण परिसरातून अटक; शफिकवर 13 गंभीर गुन्ह्यांची नोंद

 

सूर्यप्रकाशापासून बचाव करण्यासाठी घरच्या घरी बनवलेले सनस्क्रीन लोशन वापरा, जाणून घ्या

 

Juhi Chawla & 5G Case | 20 लाखांचा दंड आणि उच्च न्यायालयानं खडसावल्यानंतर अभिनेत्री जुही चावला म्हणाली…(व्हिडीओ)

 

गर्भधारणेत मधुमेह असलेल्या स्त्रियांनी ‘या’ पध्दतीनं वजन कमी करावे; जाणून घ्या

 

Indian Cricketers Match Fee | काय सांगता ! होय, भारतीय क्रिकेटर तासाला कमावतात एक लाख, ‘हे’ काम केल्यास मिळते मोठी रक्कम अन् बोनसवेगळा