बाबा रामदेव यांची मोठी घोषणा ! आता करणार स्वस्तातील पतांजली सॅनिटाझर ‘लॉन्च’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पतंजली आयुर्वेदचे संस्थापक आणि योगगुरू बाबा रामदेव यांनी शुक्रवारी सांगितले की, कोरोनाव्हायरसमुळे भारतातील परिस्थिती पाहता संसर्ग पसरण्याचा धोका कायम आहे. त्यात देशातील हँड सॅनिटायझरचा काळा बाजार वाढला आहे. तूप आणि तेलाची मागणीही वाढली आहे. अश्या परिस्थितीत पतंजली आयुर्वेद हँड सॅनिटायझर तयार करणार असल्याचे बाबा रामदेव यांनी आज जाहीर केले आहे, ते म्हणाले की, 15 दिवस ते एका महिन्यात पतंजली आयुर्वेदचा हॅन्ड सॅनिटायझर उपलब्ध होईल. यावेळी त्यांनी असा दावा केला की आम्ही अधिक प्रभावी सॅनिटायझर तयार केला आहे.

सॅनिटायझर संदर्भात काळाबाजार
कोरोना विषाणूच्या भीती दरम्यान सावधगिरी म्हणून हात सॅनिटायझरची मागणी वाढली आहे. बरेच विक्रेते असे म्हणतात की, त्यांनी काही दिवसांत कित्येक महिन्यांपासूनचा स्टॉक विकला आहे. दुसरीकडे, अशीही बातमी आली होती की, विक्रेते मागणी लक्षात घेता वाजवी किंमतीपेक्षा जास्त किमतीत सॅनिटायझर्स आणि मास्क विकत आहेत.

पतंजलीने अनेक उत्पादनांच्या किंमती कमी केल्या
शुक्रवारी बाबा रामदेव म्हणाले की त्यांच्या कंपनीने पाम तेल, सोया तेलाच्या किंमतीत 20 टक्क्यांनी कपात केली आहे. आम्ही देशाला बाजारपेठ नव्हे तर एक कुटुंब मानतो. हेच कारण आहे की, या वेळी आम्ही साबणाच्या किंमतीत 12.5 टक्क्यांनी कपात केली आहे. तसेच कोरफड, हळद आणि चंदन यांच्या किंमतींमध्येही अशीच कपात आहे.

पतंजलीचे सॅनिटायझर स्वस्त आणि अधिक प्रभावी असेल
बाबा रामदेव म्हणाले की, त्यांच्या कंपनीमार्फत बाजारात उपलब्ध हँड सॅनिटायझर परदेशी कंपन्यांपेक्षा स्वस्त आणि कार्यक्षम असेल. दरम्यान, मागील आठवड्यातच केंद्र सरकारने मास्क आणि हॅन्ड सॅनिटायझरला इसेन्शिअल कमोडिटी ऍक्ट मध्ये 30 जूनपर्यंत टाकले होते. जेणेकरून त्याचे होर्डिंग करता येणार नाही आणि ते बाजारात सहज उपलब्ध होतील.