‘मोदी सरकार’च्या ‘या’ निर्णयाचं रामदेव बाबांकडून ‘कौतुक’, शेतकऱ्यांना मोठा ‘दिलासा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारने रिफाईन्ड पाम तेलाच्या आयातीला रिस्ट्रीक्टेड कॅटेगरीत टाकलं आहे. आता व्यापारी लायसन्स घेऊनच पाम तेलाची आयात करू शकतील. घरगुती रिफायनर्सना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने हे पाऊल टाकलं आहे. याचा घरगुती उद्योगांवर किती परिणाम होईल यावर योग गुरू रामदेव बाबा यांनीही भाष्य केलं आहे. नुकतंच पतंजली आयुर्वेदने रुचि सोया खरेदी केलं आहे. रुचि सोयाकडे खाद्यतेलाच्या रिफाईनिंगची मोठी क्षमता आहे.

घरगुती रिफायनर्सना दिलासा देत रिफाईन्ड पाम तेल रिस्ट्रीक्टेड कॅटेगरीत टाकण्यात आलं आहे. RBD पाम ऑईल, RBD पामोलीनच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे घरगुती रिफायनर्सना दिलासा मिळणार आहे. यामुळे घरगुती रिफायनिंग क्षमतेचा उपयोग वाढणार आहे. जवळपास 65-70 टक्के क्षमतेचा उपयोग होत नव्हता.

बाबा रामदेव यांनी सरकारने टाकलेल्या पावलावर आपले मत मांडताना सांगितले की, “इंडस्ट्री आणि शेतकऱ्यांसाठी हे चांगलं पाऊल आहे. याशिवाय देशाला खाद्यतेलाबाबत स्वावलंबी व्हावं लागणार आहे. बजेटमध्ये सरकारने शेतकऱ्यांवर फोकस करणं गरजेचं आहे. याशिवाय दीर्घकालीन रणनीती तयार करायला हवी” असेही ते म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/