कांदे काय मोदी उगवणार आहेत का ? : रामदेव बाबा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कांद्याचे भाव गगनाला भिडले असून नागरिकांकडून कांद्याचे भाव कमी करण्याची मागणी सरकारकडे करत आहेत. यावर बोलताना योगगुरु रामदेव बाबा यांनी उलट प्रश्न विचारला आहे. लोक मोदी यांना म्हणतात कांद्याचे भाव कमी करा. मोदी हे काय कांदे उगवणार आहेत का असा सवाल त्यांनी केला आहे. संगमनेर येथील गीता महोत्सवामध्ये बोलताना हा सवाल रामदेव बाबांनी केला आहे. त्यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते.

कांदा टंचाई झाल्यामुळे कांद्याचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या ताटातून कांदा गायब झाला आहे. देशातील सध्याची परिस्थीती पाहता परदेशातून कांदा आयातीबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. त्यातच संगमनेर येथे गीता महोत्सवामध्ये रामदेव बाबा यांनी कांद्याच्या वाढणाऱ्या दराविषयी भाष्य केले आहे.

आज कांद्याचे भाव वाढत असून लोक मोदी यांना म्हणतात कांद्याचे भाव कमी करा. मोदी हे काय कांदे उगवणार आहेत का, असा प्रश्न उपस्थित करताच काही लोक मोदी यांना उगाच कोसत असल्याचे रामदेव बाबा यांनी स्पष्ट केले. तसेच आज काही जण देशात अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. देशात हिंसा वाढली आहे. पण हे थांबवण्यासाठी चांगले संस्कार हा उपाय असल्याचेही रामदेव बाबा म्हणाले.

Visit : Policenama.com