अभिनेता सुशांतसाठी बाबा रामदेव यांनी केला ‘यज्ञ’ (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाईन – अभिनेता सुशांत सिंहच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी योगगुरु बाबा रामदेव यांनी एक विशेष यज्ञ केला होता. या यज्ञाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला दोन महिने उलटून गेले आहेत. मुंबई पोलीस, बिहार पोलीस अन् आता ईडीमार्फत या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

मी सुशांतजींच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. त्यांच्या वेदना ऐकून माझ्याही मनाचा थरकाप उडाला. आम्ही सर्वजण पतंजलीमध्ये सुशांतच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करत आहोत. सुशांत आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा हीच इश्वर चरणी प्रार्थना अशा आशयाचे ट्विट बाबा रामदेव यांनी केले आहे. शिवाय यज्ञाचा एक व्हिडीओ देखील त्यांनी पोस्ट केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात सुशांतच्या कुटुंबीयांनी अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे दोन वेळा रियाची ईडीने चौकशी केली आहे. या चौकशीमध्ये अनेक गोष्टींचा उलगडा झाला असून तिचे फोन कॉल्स रेकॉर्डदेखील समोर आले आहेत.